पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कराचा बोजा दर माणशी सन १८८१ साली रु. ३-९० होता वरन १८९१-९२ साली रु. ६-२९ होता. मद्रास शहर मुनसिपालिटी संबंधाने तेथील कायदे कौन्सिलांतून तीन कायदे सन १८६७, १८७८, व १८८४ साली झाले. पहिले कायद्याने ३२ स- भासदांची सभा स्थापन झाली; तिचा प्रेसिडेंट पगारी असे. सभासद निवडण्या- ची लोकांस परवानगी देण्यासंबंधाने कायद्यांत ठराव होता, परंतु तो जागचे जागीच राहिला होता. सन १८७८ सालचे कायद्यावरून निम्मे सभासद निवड- ण्याचा अधिकार कर देणारे लोकांस मिळाला. सन १८८४ साली हा कायदा रद्द होऊन नवीन कायदा झाला त्यांत २४ सभासद कर देणारांनी निवडण्याचे व ११ सरकारांनी नेमण्याचे ठरले. लोक संख्येचे मानाने शेकडा सुमारे एक मनुष्यास मत देण्याचा अधिकार आहे. या शहराचा गेले १० वर्षांचा इतिहास ह्मणजे पाणी व त्याचा निकाल यासं- बंधाने असलेले नैसर्गिक अडचणींचा परिहार करण्यासाठी केलेले प्रयत्नांचे वर्णन होय. हे शहरही अगदी सपाटीवर आहे यामुळे, ज्या भागांतील घाणेरे पाणी समुद्रांत जात नाही त्या भागांतील पाणी बाहेर नेण्यास कृत्रिम उपायांची व यंत्रांची योजना करावी लागली आहे. पाणी आ- णण्यासंबंधानें विलायतेहून मुद्दाम आणलेले एका तच्छास्त्रज्ञाकडून पाहणी व अंदाज करण्याचे चालू आहे. या शहरांत मैला काढण्याचे संबंधाने व्यवस्था अ- सावी तशी नाही. मृत्यूचे प्रमाणही जास्तच आहे. या शहरांत व्यापार मोठा नसल्याने बाहेरचे लोक फार येत नाहीत. सन १८९१ चे मनुष्य गणपतीचे वेळी शेकडा ७० लोक या शहरांतच जन्मलेले आहेत असे दिसून आले. या कारणाने या शहरांत जन्मभरणाचे दाखले बरोबर रहातात. मृत्यूंचीसंख्या वाढण्यास कारणे उपरी वस्तीचा अभाव व लहान वयाचे मरणारे मुलांची मोठी संख्या ही आहेत. मुंबईसारखे व्यापारी शहरांत उपरी वस्ती फार असल्याने सडे रहाणारे लोक जास्त असतात, त्यामुळे त्यांचे कुटुंबांतील जन्म मृत्यूमुळे त्या शहरचे संख्येवर परिणाम होत नाही. या शहरास पाण्याची अजून टंचाईच आहे. या शहरावर कराचा बोजा फार कमी आहे, याचे कारण असे आहे की व्यापार फारसा नसल्यामुळे मिळ- कतीची किंमत वाढलेली नाही व त्यामुळे अल्पप्रमाणाची कराची आकारणी होते. सन १८८१ साली कराचा बोजा दरमाणशी रु. १.८७ होता व सन १८९१ साली रु. १.९४ होता. कर्ज सन १८९१ साली रु. २८७०००० व सन १८९२-९३ झाली रु. २७००००० होतें.