पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८७२-१८७८ साली झाले व त्यानंतर हल्लीचा कायदा झाला. सन १८६५ चे कायद्याने शहरासाठी नेमलेले जस्टिस आफ धी पीस व एक पगारी म्युनिसि- पाल कमिशनर यांचेकडे व्यवस्था ठेवली होती. कमिशनर याजवर व्यवस्थेची व जमाखर्चाची सर्व जबाबदारी होती ; जस्टिस लोकांस बजेटाची तपासणी करण्याचा अधिकार असे, परंतु तो नांवाचा मात्र होता. सन १८७२चे कायद्या- वरून निवडणुकीचे तत्व प्रथमत: लागू झाले व हल्ली आहेत त्याप्रमाणे कारपोरे- शन व टौनकौन्सिल ह्या दोन सभा स्थापन झाल्या. त्यानंतर सन १७७८ सा- ली त्या कायद्यांत कांही सुधारणा झाल्या, व त्यानंतर हल्ली सुरू असलेला कायदा सन १८८८ साली झाला. त्याप्रमाणे कारपोरेशनांत ७२ सभासद असतात, त्यां- पैकी ३६ वार्डातील लोकांनी, १६ जस्टिस आफ धी पीस यांनी, दोन युनिव्ह. सिटीचे सेनेटनें व दोन चेंबर आफ कामर्स नामक व्यापारी सभेने निवडण्याचे आहेत. कमिशनर सुद्धा १६ सभासदांची नेमणूक सरकार करते. पूर्वीचे टौन- कौन्सिलाचे बदली हल्ली कारपोरेशनची स्टांडिग कमिटी आहे. तीत १२ सभासद असतात व तीच आपला चेअरमन निवडते; व कमिशनर या कमिटींत सभासद असतो. शिक्षणाचे व दवाखान्यांचे व्यवस्थेचे काम कारपोरेशन व सरकार यांनी नेमलेले संयुक्त कमिट्यांकडून करविण्याचे व वेगळाली कामें वेगळाले कमि- ट्यांकडे वाटण्याचे याच कायद्यावरून सुरू झाले. या शहरांत खर्चाच्या बाबी अनेक आहेत. गोद्या व कापसाच्या गिरण्या झाल्याने रस्त्यांचा विस्तार फार वाढला आहे; पाणी लावून आणावे लागले आहे व शहर सपाटीवर असल्यामुळे घाणीचा निकाल लावण्यास अनेक हिकमती कराव्या लागल्या आहेत. क्षेत्र मर्यादित असलेमुळे वस्ती वाढण्यास मार्ग राहि- ला नाही. वरचे वर्गाचे लोक आतां शहराबाहेर जवळ जवळ असलेले गांवांतून राहू लागले आहेत; तरी धंदा रोजगार करणारे मंडळीस गांवांतच रहावे लागते, यामुळे शहरचे मध्यभागांतील वस्ती अतोनात दाट झाली आहे. गटारे करण्या- संबंधाने पद्धतशीर अशी व्यवस्था पूर्वीच ठरविलेली नसल्यामुळे ते काम झपा- ट्याने झालेले नाही. हल्ली मि. बाल्डविन लाथाम यांनी या प्रश्नाचा विचार करून दोन उपाय सुचविले आहेत व त्यांचा अनुभव पहाण्याचे काम चालू आहे. पाण्याचे पुरवठ्याचे संबंधाने प्रयत्न जास्त सफल झाला आहे. या कामास मूळ प्रारंभ विहाडचे तलावापासून झाला, तें काम सन १८६० साली पुरे झाले. १८७२ साली तुळशी तलाव बांधण्यात आला; तरीही पाण्याचा पुरवठा पुरेसा होईना, तेव्हां मुंबई पासून ५४ मैलांवर घाटांतील एका खोऱ्यांत नदीस धरण वांधून पाणी आणले आहे. ह्या तानसा तलावाचे पाणी शहरांत सोडण्याचा समा-