पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कलकत्ता शहरांत व्यवस्थेचे कामी फार अडचणी येतात. ते अगदी सपाटीवर आहे. यामुळे पाणी पुरविणे, व त्याचा निकाल लावणे, ही कामें सोठे श्रमाची व खर्चाची आहेत. त्या शहरचे हद्दीत खासगी जमिनी झोपडी बांधून राहण्यास दिल्या आहेत; त्या ठिकाणी गलिच्छपणा फार असतो. शहराचे उपांत- भागांत पुष्कळ वाड्या आहेत व त्यांतील सफाईची व्यवस्था सन १८८९ साला- पर्यंत स्वतंत्रपणे होत असे. पुढे त्यांचे अस्वच्छतेबद्दल फार तकरारी झाल्या- वरून अखेर त्या बाड्या शहरचे म्युनिसिपालिटीचे हद्दीत सामिल केल्या व त्या हद्दीत म्युनिसिपालिटीने अमुक रक्कम खर्च केलीच पाहिजे असें ठरविले. हल्ली याप्रमाणे व्यवस्था चालू आहे. ह्या शहरांत महामारीचे वास्तव्य काय- मचे असते, तरी अलीकडे पाणी शुद्ध करून देण्यांत येऊ लागल्यापासून पूर्वी- पेक्षां स्थिति पुष्कळ सुधारली आहे. पैशासंबंधाने म्युनिसिपालिटीची स्थिति चांगली आहे. ह्यास प्रमाण ह्मणजे दोन वर्षांपूर्वी म्युनिसिपालिटीने कर्जासाठी जाहिरात दिली होती, तेव्हां हवी होती तिचे सहापट रक्कम लोकांनी देण्यास कबुली दर्शविली होती. कमिशनर लोक काय लक्ष लाऊन काळजीने व फार चांगले करतात, परंतु कर वसूल कर- ण्यांत थोडी कसुरी होते असे स्थानिक सरकारांनी सन १८९२-९३ साली मत दिले आहे. दरमाणशी कराचा बोजा शहरांत ७.२५ टके व उपांत भागांत २.६९ टके बसतो. सन १८८२ साली कर्जाची रक्कम रु. १२४२२२७० होती व सन १८९२-९३ साली रु. २३००६११७० होती. या मुनासपालिटीची जमा व खर्चाचे वावतींत स्थिती पुढे लिहिल्याप्रमाणे आहे. या मुनसिपालिटीची जमा सन १८९१-९२ साली रु. ४५६५०८० होती. त्यांत मुख्य बाबती, कर रु. ३२२३५८०, व धंद्यावरील कर रु. ५२५११० ह्या होत्या. खर्च रु. ४४९८८६० होता. शिक्षणावर खर्च रु. २९: ० काय तो होता. सन १८९२-९३ साली जमा रु. ४३००४३०. पैकी कर रु. ३३११९९० व धंद्यावर कर रु.५३६६१०. खर्च रु. ४३६३६३०. शिक्षणावर या सालीही खर्च फारच कमी झाला. सन १८८२-८३ सालीं जमा रु. २७००१२० होती. त्यांत कर रु. १६१६७० व धंद्यावर कर रु. ४५०१८०. खर्च रु. २२६५६०० होता. मुंबई शहर-म्युनिसिपालिटीचे संबंधाने मुंबईसरकारचे कायदे सन १८६५-