पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(६४ ) एकूण जमा... चालू खर्च... एकूण खर्च ... ... एकूण नेहमीचे उत्पन्न.. २२६६३४५० ३३९५५९४० कर्ज व ठेवी ६३९८९७० ६४८०७८०० २९०६२४२० ९८७६३७४० २४५९३६७० ३९०२४०९० कर्जाची फेड व ठेवी... ६५१९९६० ५८२२२३६० ३१११३६३० ९७२४६४५० दरमाणशी सरासरी रुपये रुपये कराचे प्रमाण. १.१३ या पत्रकांतील आकड्यांचा प्रांत वार तपशील वर दिलाच आहे त्यावरून वेगळाले प्रांतास वेगळाले कर कसे पसंत आहेत तें दिसून येईल. आक्ट्राय-एकंदरीत हिंदुस्थानांत प्रत्यक्ष करास लोक नाखुष असतात. तेव्हां आक्ट्राय कर हा अप्रत्यक्ष असल्याने लोकांस आवडता असणे हे स्वाभा- विकच आहे. ह्या कराचा भार फार अल्प असतो व पूर्वीचे अमदानीपासून तो कर घेण्याचा परिपाठ असल्यामुळे, लोकांस तो देण्याची सवय आहे, व त्यामुळे तो करसा वाटतही नाही. हा कर अर्थशास्त्राचे तत्वांप्रमाणे योग्य नाही. तो गांवांत खपणारे मालावरच घेण्याचा नियम राहणे अशक्य आहे. फक्त शहर वलांडून जाणारे मालावर हा कर वसणे ह्मणजे तो व्यापारास व्यत्ययकारक होतो; कारण शेजारचे खेड्या- पाड्यांत खपासाठी जो माल खरेदी होऊन जातो त्यावर कर घेणे ह्मणजे तो कर त्या गांवांवर, त्यांस फायदा नसतां, बसविण्यासारखे होते. या कारणांसाठी सरकार या हरकती वारंवार मुनसिपालिट्यांचे नजरेस आणून तो कर कमी क- रविण्याविषयीं लक्ष ठेवतें व त्या कराचे अंमलबजावणीवर सेक्त देखरेख करते. हा कर घेण्याचे व तो कसा वसूल होतो हे पाहण्याचे संबंधाने सरकारांनी कांहीं नियम ठरविले आहेत. स्थानिक खपाचे मालावर कर घेण्यात यावा, तसा माल नसून व्यापारासाठी जो बाहेर जाणारा माल असेल त्यावर, व ज्यावर सी- कस्टम कायद्याप्रमाणे दस्तुरी घेण्यात येते असे मालावर, कर घेण्यांत येऊं न- येत व शहर वलांडून जाणारे मालावर घेतलेला कर परत देण्यात यावा असे ठरविले आहे. ज्या त्या प्रांतांत माणशी वेगळाली धान्ये व इतर पदार्थ किती लागतात यांचे अजमासाचा आंकडा ठरविण्यात आला आहे व त्या मानाने विवक्षित शहरांत कर दे- णारे मालाचा खप किती झाला हे पाहण्यांत येते; व त्या प्रमाणापेक्षां विशेषसा जास्त