पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बहाद्दर आपले कराव न सोडतां विद्यासंपन्न झाले, व आपले वर्तनाने स्वातंत्र्य- प्रियतेचा धडा इतरांस घालून देऊ लागले, तर ती स्थिति सर्वतोपरी देश- कल्याणकारक होईल. हल्लीचे मानावरून पाहतां सर्वच वर्ग नेभळ्या लेखक- वर्गात येऊन वरील उक्तीची प्रतीति दाखवील अशी भीति आहे. ] खालील पत्रकावरून एकंदर मुनसिपालिट्यांचे हातून केवढी घडामोड होते हे दिसून येईल; तुलनेसाठी सन १८८१-८२ सालचे आंकडे दिले आहेत. मुन- सिपालिट्यांची संख्या कमी दिसते याचे कारण पूर्वीच्या पुष्कळ लहान मुन- सिपालिट्या कमी होऊन त्यांची व्यवस्था लोकल बोर्डाकडे गेली आहे हे आहे. पाणी व कंदील लावणे यासंबंधाचे कर सार्वत्रिक झाल्याने व सरकारी मदत किंवा पूर्वी सरकारांत जात असलेले स्थानिक कर हे मुनसिपालिट्यांकडे दिले गेल्याने आद्यांत वाढ झाली आहे. एकंदरीत शेकडा ४४ टक्के ऐवज आरोग्याकडे, २१ टक्के रस्ते वगैरे सोईचे कामाकडे, संरक्षणाकडे ८ टक्के, शिक्षणाकडे ६ टक्के, कर वसूल करणे व व्यवस्था करणे या कामांकडे १० टक्के असा खर्च सन १८९१-९२ साली होता; बाकीचे ११ टक्के इतर किरकोळ सदरी खर्च झाला होता. आक्ट्रायचें उत्पन्न सर्वांत मोठे आहे. वीस टक्के सुमारे स्थावरावरचे करा- पासून येते; पाणी, उजेड वगैरेंचे तजविजीबद्दल सुमारे १५१ टके येते; दस्तु- च्यापासून २१ यतें. सामान्यतः ७६ 3 टके करापासून उत्पन्न होते; बाकी २३ ४ इतर किरकोळ वाबीपासून येते. एकंदरीत दरमाणशी कर १३ रुपाया बसतो, हा फार आहे असें नाही. १८८१-८२ १८९१-९२ एकंदर मुनसिपालि- टयाची संख्या... त्यांचे अधिकारांतील लोकसंख्या ७९४ आक्ट्राय कर आकारलेले कर इतर कर. करापासूनचे जमेची बेरीज इतर उत्पन्नाच्या बाबी १४२९५५०२ रु. ७०३६२७० २५२३६६० ७१६३८३० १६७२३७६० ५९३९६९० १५७४२५८१ रु. ८४५९९६० २५५४१५० १२४८६३६० २३५००४७० १०४५५१७०