पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(६२) १९३२०. रु. १००५०, दंड, फी वगेरे रु. १११३६०, सरकारांतून व लोकलफंडांतून आ- लेली जमा रु. २०४००, कर्ज रु. १८९५६०. खर्च रु. ५६५२८०. तपशील:-कर वसूल करणे व व्यवस्था रु. ५४०७० सार्वजनिक संरक्षण रु. ३८१५०, आरोग्य रु. २७८३३०, सोई रु. १०४२६०, शिक्षण रु. २३४४०, किरकोळ रु. ४३७१०, कर्जाची फेड व व्याजी लावणे रु. जमाखर्च १८९२-९३. जमा रु. ४९९९७. तपशील:-करापासून रु. २८७४३०, कराशिवाय इतर रु. ११७२४०, कर्ज रु. ९५३००. खर्च रु. ५२२९७०. सन १८९२-९३ साली या तीनही प्रांतांत मिळून मुनसिपालिटया १० होत्या. सन १८९१-९२ साली या मुनसिपालिट्यांतील लोकांवर कराचा बोजा माणशी रु. ०.९७पडला. स्थानिक स्वराज्यव्यवस्था सुरू होउन फारच थोडी वर्षे झाली असल्यामुळे, ते अधिकार ठिकठिकाणचे लोकांस दिल्यापासून व निवडणुकीचे तत्व प्रचारांत आणल्यापासून फायदा किती झाला आहे हे निश्चयात्मक सांगतां येण्यासारखें नाही. हा सर्व काल अनुभव येण्यांतच गेला आहे; तरी एकंदरीत मागें पाउल गेलें असें वाटत नाही. या देशांत संपत्ति व विद्वत्ता यांशी लोकमान्य- तेचा संबंध फार वेळां कमी दृष्टीस पडतो, व सरस्वतीचें व लक्ष्मीचें बद्ध वैरही प्रसिद्धच आहे, तेव्हां निवडणुकीने सभासदत्व प्राप्त झाल्याने, लोक मान्यता वाढली या कारणाने वरचे दर्जाचे लोकांस जनसमाजाची खुषामत करून लोकनियुक्त सभासदत्व प्राप्त करून घेण्यापेक्षा, सरकारांतून नेमणूक होऊन येणे हे जास्त महतिदायक वाटते. आणखी दहा पांच वर्षांनी राजनीतितत्वांच्या ज्ञानाचा फैलाव वरचे व खालचे दर्जाचे लोकांत सामान्यतः जास्त होईल व तें ज्ञान हल्ली मधले दर्जाचे लोकांतच जसें अडकून राहिले आहे, तसें रहाणार नाही; व तसे झाल्यानंतर कालांतराने लढवय्या हो साळी-कुंभा- राचा प्रतिनिधि होउन कलमबहाद्दरांस अधिकारच्युत करील असा अजमास आहे. [ श्रेष्ठ दर्जाचे लोक म्युनिसिपालिटयांत येण्यास नाखूष असण्याचे कारण जें वर दिले आहे ते सर्वांसच मान्य होईल असे नाही. प्राचीन लेखकवर्गास प्राचीन तरवारबहाद्दरवर्गापैकी लोक अंशतः तरी पदच्युत करतील, ही गोष्ट खरी आहे ; परंतु ती स्थिति, ज्या त-हेने होऊ पहात आहे तिचेकडे व एकंदर परिणामाकडे लक्ष दिले ह्मणजे ती मोठी स्पृहणीय होईल असें ह्मणवत नाही. कलमवाल्यांनी आपले कलमांस विश्रांति देउन व्यापारांत पडले, किंवा तरवार- असें लोकांस वाटत नाही. ..