पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सन १८९२-९३ साली १५ झाल्या. मांडले येथील म्युनिसिपालिटीच काय ती महत्वाची आहे. कराचा बोजा माणशी ०५९. वहाड-या प्रांतांत १८७३ चे पंजावचे कायद्याप्रमाणे मूळ कमिट्या स्थापन करण्यांत आल्या. सन १८८६ साली फारीन खात्यांतून इतर प्रांतांप्रमाणे याही प्रांतांतील मुनसिपालिट्यांची व्यवस्था करण्यासाठी हुकूम देण्यात आला आहे. ह्या व्यवस्था इतर प्रांतांतल्याप्रमाणेच असल्यामुळे त्यांचा विशेष विस्तार करण्याची जरूर नाही. व-हाडांत सन १८९१-९२ साली आठ मुनसिपालिटया होत्या व त्यांत १२९ सभासद होते, त्यांपैकी ९० लोकनियुक्त व ३९ सरकारांनी नेमलेले होते. निवडणुकांचे वेळी शेकडा १७ पासून ४९ मतदार वेगळाले शहरांत मत दे- ण्यास गेले होते. मुनासपालिटयांचे हद्दीतील लोकांपैकी शेकडा ४३ लोकांस मत देण्याचा अधिकार आहे. सन १- ९१-९२ सालचे दशवार्षिक रिपोटति या प्रातांबद्दल जमा व खर्चा- चा तपशील वेगळा नाही. लहान प्रांतांचा एके ठिकाणी तपशील दिला आहे. तेव्हां पुढे सन १८९२ सालाचे रिपोटातीलच तपशील घेतला आहे, परंतु तोही जमा १८९२-९३. रु. २०७९९०. तपाशील:-धंदे व रोजगारांवर कर रु. ४४५००, पाण्यावर कर रु. १२७५०, सफाईसंबंधीं कर रु. १९२३०, कापूस व धान्यांचे खरेदीविक्रीवर कर ( दोन मुनसिपालिट्यांत ) रु. २५७३०, मार्केटें व इतर मुनसिपालिटीचे मिळकतीचे भाडे रु. ७३७१०. खर्च रु. १९४७८० तपशील:—सार्वजनिक सोई व आरोग्य रु. १४४२५०, संरक्षण रु. ७९२०, शिक्षण रु. १७३३०, कर वसूल करणे व व्यवस्था रु. १३६३०. अजमीर व कुर्ग प्रांतांसंबंधाने विशेष सांगण्यासारखे काही नाही. या प्रांतां- तील व्यवस्था इतर प्रांतांतील नमुन्याप्रमाणेच चालते. पार्लमेंटास सादर झालेले रिपोर्टात अजमीर, कुर्ग व वन्हाड, या प्रांतांचे आंकडे एकवट दाखल झाले आहेत; व त्याबद्दल जमा व खर्चाचें पत्रकही एकच दिले आहे ते पुढे लिहिल्याप्रमाणे:- हे तीनही प्रांत मिळून सन १८९१-९२ साली जमा रु. ५५९०५०. तप- शील:-आक्ट्राय रु. २०८३३०, घरें व जमिनीवर कर रु. ११०९०, गाड्या व वाहनांवर रु. ६००, धंदे-रोजगारावर रु. ७६६०, शहरसफाईसंबंधी कर पुरा नाही.