पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

झाल्या व काही ठिकाणी जरूरीप्रमाणे झाल्या. अलीकडे व्यवस्थेचे कामाचा भाग पुष्कळसा पोटकमिट्यांकडे सोपविण्याची वहिवाट सुरू झाल्यापासून व्य- वस्था चांगली चालली आहे. कराचा वोजा दरमाणशी रु. १.४३ पडतो. जमा व खर्च-सन १८९१-९२, जमा रु. ४४२८११०, तपशील:-आक्ट्राय रु. २७०३४८०, कर घरांवर व जमिनीवर रु. १२२१५०, गाड्या व जनावरावर रु. २६२७०, पाण्यासंबंधाने रु. १०५०, शहरसफाई रु. ६७६०, इतर रु. १६२५०, भाडे, फी, दंड व किरकोळ रु. ८०३१५०, सरकारांतून व लोकलफंडां- तून रु. २८२७८०, कर्ज रु. ४६६२२०. खर्च रु. ४३५४४१०, तपशील:-कराचा वसूल व व्यवस्था रु. ५६७९८०, सार्वजनिक संरक्षण रु. ६०४९४०, आरोग्य रु. १५४५६०, सोई रु. ५९६२२०, शिक्षण रु. ५३१८७ ., किरकोळ रु. ३७२९४०, कर्जाची फेड व ठेवींत रु. १३४८६०. जमाखर्च सन १८९२-९३. जमा रु. ४३२९१८०. तपशील:-करापासून रु. २७६५४६०, करा शिवाय दुसऱ्या बावींपासून रु. १०७८ २००, कर्जापासून रु. ४८५५२०, खर्च रु. ४४८८९५०. मध्यप्रांतांत १८६९ सालचा पंजाबा साठी केलेला कायदा लागू करण्यांत ये- ईपर्यंत मुनसिपालिट्यांची व्यवस्था कायद्याने बांधलेली नव्हती. यो प्रांतासाठीच १८७३ साली कायदा करण्यांत आला. निवडणुकीचे तत्व पूर्वी पासूनच प्रचा- रांत होते. १८८९ सालांत नवीन तत्वांप्रमाणे कायदा करण्यांत आला. या प्रां- तांत सरकारी सभासदांचे प्रमाण जास्त आहे व ते जास्तीत जास्ती झणजे तीनपंचमांशापर्यंत वाढवितां येते. सन १८९१-९२ साली ५७ मुनसिपालिटया होत्या व त्यांपैकी १ त्या साली बंद करण्यांत आली; तेव्हां सन १८९२-९३ साली ५६ राहिल्या. सन १८९२-९३ साली ६२९ सभासदांपैकी ४४० लोक नियुक्त व १८९ नेमणुकीचे होते. युरोपिअन सभासद सुमारे होते. सभासद निवडण्याचे कामी लोक ब- रीच आस्था दाखवितात. नागपूरमुनसिपालिटीची व्यवस्था फारच चांगली असते व इतर मुनसिपालिटयांतही सभासद चांगले लक्ष घालतात. आक्ट्राय कराचा वसूल नियमितपणाने घेण्यांत येतो; आरोग्याची कामे करण्याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे, असा स्थानिक सरकारचा अभिप्राय आहे. कराचा बोजा दरमाणशी रु. १.४५ आहे. जमा व खर्च सन १८९१-९२, जमा रु. १७१५७६०, तपशील:-आक्ट्राय रु. ८०२१६०, दस्तुऱ्या रु. ७०५०, कर घरांवर व जमिनीवर रु. २९६००,