पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. व्यवस्था १८६७ चा कायदा होईपर्यंत सरकारांनी नेमलेल्या कमिट्यांकडून होत असे व त्या कामास आक्ट्राय व दुसरे कर बसवून पैसा उत्पन्न करण्यात येत असे. ही व्यवस्था १८६७ साली कायद्याने बांधली गेली व तोच कायदा अयो- ध्या व मध्यप्रांतासही लागू करण्यांत आला. पुढे या कायद्यांत सन १८७३ साली दुरुस्ती करण्यांत आली. या इलाख्यांत मुनसिपालिट्या तीन वर्गाच्या अ- सत. पहिल्या वर्गाच्या मुनसिपालिट्या चार मुख्य शहरांत व चार गिरिशिखरस्थ हवेचे ठिकाणी होत्या व त्यांस सरकार मंजुरातीशिवाय वाटेल तितका खर्च करण्याचा अधिकार होता; दुसरे वर्गाचे कमिव्यांस दोन हजारांपेक्षा जास्त रकम एका कामावर लावण्यास कमिशनरची मंजुरात घ्यावी लागे, व तिसरे वर्गाचे मुनसिपालिट्यांस सर्वच खर्च सरकारी अमलदारांचे मंजुरातीने करावा लागे. कमिन्यांत सरकारी नौकर व नौकरीत नसलेले सभासद असत; त्यांत सरकारी सभासद ६ शापेक्षा जास्त नसत. एकंदर सभासदांची संख्या पांचापेक्षा जास्त असावी लागे. जिल्याचा डेपुटी कमिशनर चेरमन असे. आक्ट्राय, धंद्यावर कर घरांवर व गाड्या व जनावरांवर कर हे त्यांस प्राप्तीचे मार्ग होते; रस्ते, तळी व गटारे करणे व पोलीस वाळगणे ह्या खर्चाच्या वावी असत. शिलक राहिली तर इतर उपयुक्त कामें ह्मणजे शाळा, दवाखाने वगैरेसारखी त्यांस करतां येत असत सन १८८४ चे कायद्यापासून काही सभासद लोकनियुक्त असण्यास सुरुवात झाली. सन १८९१ साली या कायद्यांत दुरुस्ती झाली व या कायद्यावरून पूर्वी काही गोष्टी करण्याचे अधिकार सरकारानी आपलेकडे ठेविले होते ते जिल्ह्याचे अधि काऱ्यांस दिले; सरकारी सभासद 3 असावे व त्यांची मुदत तीन वर्षे असावी असें ठरविले. प्रेसिडेंटाची निवडणूक कमिट्याच करतात व कारणपरत्वे हा अधिकार सरकार आपलेकडे ठेवितात. या इलाख्यांत सभासद निवडण्याचे नि. यमांत एक मोठी विशेष गोष्ट आहे ती ही की, लाहोर शहरांत निरनिराळे धर्माचे लोकांस आपले तर्फे वेगळाले सभासद निवडण्याचा अधिकार देण्यात आला आहे. व हिंदु, मुसलमान, शीख, व निस्ती हे आपल्या तर्फेनें एक एक सभासद निव डून देतात. इतर शहरांतही बरेच वेळी सभासदांची निवडणूक करण्यांत धर्माचे घोडें प्रधानत्वाने पुढे येते. या प्रांतांत सन १८९१-९२ व १८९२-९३ साली १४९, मुनसिपालिट्या होत्या, त्यांपैकी ११ कमिट्यांस । सभासद निवडण्याचा अधिकार होता ११ कमिट्यांतील सर्वच सभासद सरकारांनी नेमलेले होते. या प्रांतांतील कमि ट्यांत एकंदर सभासद १६५६ होते, पैकी ८०५ लोकनियुक्त होते. सभा भर- विण्यासंबंधाने सर्व ठिकाणी स्थिति सारखी नव्हती; कांही ठिकाणी त्या कमी