पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुप्रिटेंडेंट हे अधिकाराचे नात्याने सभासद असत व दुसरे गांवचे लोक नेमण्यांत येत असत; असे लोक सातापेक्षा कमी नसत. घरें व जमिनी यांजवर व वाहनांवर कर वसवून उत्पन्न करण्याचा त्या कमिट्यांस अधिकार दिला होता व सार्वजनिक उपयोगाचे कामांसाठी कर्ज काढण्याची त्यांस परवानगी होती; पोलीसचा सर्व खर्च म्युनिसिपालिट्यांवरच ठेवला होता. लहान शहरांसाठी १८६८ चा ६ वा कायदा करण्यांत आला होता, त्यांत लोकमतास तत्वतः जास्त मान दिला होता, तरी व्यवहाररीत्या त्या कमिट्यांस माजिस्ट्रेट चेर- मन असत, कमिटयांकडे सल्लामसलत देणे, कराची आकारणी करणे, व खर्चाची तपासणी करणे, हीच कामें होती. सन १८७३ चे कायद्याने मोठे शहरांतील म्युनिसिपालिट्यांत मेंबर व व्हेसचेरमन निवडण्याची परवानगी देण्याचा अधि- कार सरकाराकडे आला ; व दोन्ही वर्गांचे म्युनिसिपालिट्यांस पोलीस, गांव- सफाई, व इतर गांवची कामें भागवून उरलेले रकमेतून शाळांचा खर्च करण्याची परवानगी ह्या कायद्याने मिळाली. सन १८७६ चे कायद्याने पूर्वीचे सर्व काय- द्यांचे एकीकरण केले व त्यांत मोठासा फरक झाला तो एवढाच की, कर घरांवर किंवा लोकांवर बसवून वसूल करण्याचा कमिशनरांस अधिकार ठेविला होता. ह्या कायद्यांत म्युनिसिपालिट्यांचे चार वर्ग केले होते ; त्यांतील पहिले दोन वर्गास मात्र म्युनिसिपालिटी हे नांव शोभण्यासारखे होते; बाकीचे दोन वर्ग ह्मणजे लष्करी किंवा हवेची ठाणी व लहान लहान खेड्यांचे जमाव यांस तें नांव शोभलें नसते. सन १८८४ साली शेवटचा जो कायदा झाला त्यांत खेड्यांचे जमाव व ठाणी ही म्युनिसिपालिटचे वर्गातून काढून टाकण्यात आली. अधिकार चालविण्यास लायख ठरविलेले म्युनिसिपालिट्यांस 3 सभासद निवडण्यचा अधिकार देण्यांत आला व तसे प्रकारचे अधिकारदानास अयोग्य असलेल्यांची, व ज्यांत सरकारचे देखरेखीची पुष्कळ जरूर होती, असे ठिकाणांची एक यादी करण्यांत आली. मत देण्याचा अधिकार येण्यास जो म्युनिसिपालिटीस कर देण्याचा, त्याची मर्यादा फार कमी ठेविली. बहुतेक मोठाले गांवीं चेरमन निव- डण्याचा अधिकार म्युनिसिपालिट्यांस दिला आहे. या कायद्यात म्युनिसिपा- लिट्यांचे अधिकार पुष्कळ वाढविले आहेत व त्या अधिकारांचा दुरुपयोग होऊ नये झणून देखरेखीचा अधिकार सरकारांनी आपलेकडे ठेवला आहे. या प्रांतांत सन १८९१-९२ साली म्युनिसिपालिट्यांची संख्या १४५ होती व सन १८९२-९३ साली आणखी एक म्युनिसिपालिटी स्थापन झाली. सन १८९१-९२ साली ११७ व सन १८९२-९३ साली ११८ म्युनिसिपालि- ट्यांस सभासद निवडून देण्याचा हक्क होता. कर देणारे लोकांपैकी सुमारें ?