पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४८ ) कलेचे शिक्षण मिळावें हाही होता. (यासंबंधाने आणखी काही माहिती फिना- न्सचे भागांत दिली आहे.) या देशांतील जनसमाजाचा बहुतेक भाग अगदी अशिक्षित असलेमुळे, त्यांस जानपदत्वाच्या जबाबदाऱ्या व कर्तव्यकम यांचा परिचय करून देण्यास, त्यांचा ज्यांत प्रत्यक्ष संबंध आहे असे बाबतींत पैशाचा विनियोग करण्याचे कामी त्यांस एके ठिकाणी वसून सल्लामसलती करण्यास लावणे यासारखे दुसरें साधन नव्हते. अशा प्रकारची कामें सामान्य लोकांवर पूर्वीचे कारकीर्दीत फार क्वचितच सोपविण्यात येत असत. हल्लीही विधेकडे ज्यांची प्रवृत्ति आहे असे लोकांवरच त्या कामांचा भार घालण्याचा लोकांचा क्रम आहे, परंतु गेले दहा वर्षांपासून या स्थितीत काही पालट पडत चालला आहे व इतर लोकही या कामांत जास्त मन घालू लागले आहेत. पूर्वी जे अधिकार कधीच चालविण्याचा प्रसंग नव्हता असे अधिकार लोकांकडून बजाविले जातांना ज्या चुक्या होतील त्या दुरुस्त करण्यास व त्यांस योग्य मार्ग दाखविण्यास, सरकारांनी आपले देखरेखीचे अधिकारही जरूर तितकेच ठेविले आहेत. निवडणुकीचे तत्व पूर्णपणे अमलांत आलेले आहे, तत्रापि या देशांतील लोकांत अनेक जाति व भेद आहेत त्यामुळे एखादे मागसलेल्या वर्गाचे सभासद लोकां- कडून निवडले गेले नसल्यास, त्या वर्गाचे लोक यावे व दुसरेही चांगले लोक या सभांत आणण्यास सवड व्हावी ह्मणून, कांहीं सभासद नेमण्याचे सरकारांनी आपलेकडे ठेवले आहे. ही स्थानिक स्वराज्यव्यवस्था अमलांत आल्यापासून बरीच चांगली चालली आहे व सभासदही काम अगत्याने करतात. ही जो लोक कल्याणेच्छा हे लोक दाखवितात ती विद्यावृद्धि होईल त्या मानाने वाढत जाणारी आहे. ह्या व्यवस्थेप्रमाणे लोकल वोडाँची कामें जितकी चांगली होतात तितकी म्युनिसिपाव्यांत दुहीचा व खासगी संबंधाचा पगडा जास्त असल्याने होत नाहीत, असें अनुभवास आलेले आहे. म्युनिसिपालिट्या व लोकलबोर्ड व इतर दुसऱ्या कमिव्या, यांचे मार्फत किती व्यवहार होतो हे पुढील पत्रकावरून दिसून येईल. या रकमांशिवाय वैद्यकी खात्याचे व शिक्षणाचे संबंधाने खर्चाचा काही भाग या मंडळ्यांचे मार्फत खर्च होत असतो. संस्थांची नांवें. १८८२-८३ १८९१-९२ म्युनिसिपालिट्या. २३९१५००० ३३९५६००० लोकलबोडे. २४२१८००० १२११००० २००००००० प्रांतिक कर. कांटोन्मेंट फंड. १७८८०००