पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४५ ) नर-जनरलांचे कौन्सिलांत एक जास्त सभासद नेमण्यांत आला व त्याने त्या वेळी नेमण्यात येणारे कमिशनाचे मार्फत कायदे तयार करण्याचे काम करावें असें ठरविण्यात आले व त्याप्रमाणे लार्ड मेकाले यांची पहिल्याने त्या जागी नेमणूक झाली. त्यांनी पहिल्याने पीनलकोड-अपराध्यांस शिक्षा करण्याचा कायदा-करण्याचे हाती घेतले व ते काम सन १८३४-३८ पर्यंत पुरे केलें. तो मसुदा पुढे २० वर्षे तसाच होता व त्या मुदतींत यांत सर पीकाक नामक कायदेपंडितांनी चांगल्या सुधारणा केल्या. शेवटी तो कायदा सन १८६० साली पास झाला. हा कायदा त्यांतील तत्वांचे व भाषेचे संबंधाने फारच चांगला वठला आहे असा कायदेपंडितांचा अभिप्राय आहे. त्या वेळचे कमिशनाने व पुढे नेमलेले कमिशनांनी विविध विषयांचे संबंधाने कायद्याचे मसुदे केले व या कमिशनाचे व कायद्याचे कामा- साठी नेमलेले कौन्सिलदारांचे श्रमाचा परिपाक हिंदुस्थानांतील सुंदर कायदे हा होय. असे उत्कृष्ट, पद्धतशीर, सुबोध, व व्यापक, असे कायदे दुसरे कोणतेही देशांत अजून झालेले नाहीत. सन १८६१ सालांत फौजदारी काम चालवि- ण्याचे रीताचा कायदा झाला. याच कायद्याचे अनुरोधाने देशांतील स्वस्थता राख- ण्याचे व गुन्हेगारांस शासन करविण्याचे व गुन्ह्यांचा निरोध करण्याचे काम होत आहे, तेव्हां एकंदर सर्व कायद्यांत महत्वाचे मानाने याचेचकडे अग्नेसरत्व आहे. फौजदारी संबंधाचा कायदा सर्व एके ठिकाणी झाला आहे. दिवाणी न्यायाचे संबंधाने सर्व बाबतीत कायदे झाले नाहीत. हिंदु व मुसलमानांची धर्मशास्त्रे आहेत त्यांत इस्टेट, दायभाग व नालांचे संबंध या विषयांसंबंधाने नियम आहेत, ते नियम न्याय व मानवी धर्म यांस विरुद्ध नसतील तितके पाहण्याचे इंग्रजसरकारास भाग आहे. हिंदु धर्मशास्त्राचे नियम प्रांताप्रांतांत वेगळे आहेत व त्यांत प्राचीन स्थानिक किंवा जातीचे प्रचारसिद्ध नियमांनी फरक होतात. असे प्रकारची बंधनें किंवा हरकती नाहीत असे इतर विषयांसंबंधाने कायदे झाले आहेत, किंवा करण्याचे काम चालू आहे. कायदे करण्याचे काम पहिल्याने मसुदा तयार करण्यापासून सुरू हातें. नंतर तो मसुदा प्रथम एक्झिक्युटिव्ह कौन्सिलांत विचारासाठी येऊन, पुढे कायदेको- न्सिलांत सादर करण्यांत येतो. नंतर तो स्थानिक सरकारांकडे पाठविण्यांत येतो. तसेंच तो मसुदा व त्याचे भाषांतर ही ग्याझिटांत छापण्यांत येतात. सर्वांचे अभिप्राय आल्यावर त्यांचा विचार कौन्सिलाचे कमिटीकडे होतो, व त्या- नंतर त्याजवर कौन्सिलांत वादविवाद होउन बहुमतानें तो पसंत झाल्यास पास होतो.