पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गव्हरनर-जनरल व गव्हरनर हे विलायतेंतील मुत्सद्दी मंडळापैकी असतात हे वर सांगितलेच आहे. बाकीचे मुख्य अंमलदार सिव्हिल सव्हिसपैकी असतात. हे अंमलदारही उत्कृष्ट गुणवान, प्रामाणिक व न्यायप्रिय असतात व चा देशांती- ल इंग्रजांचें राज्य हेच या गोष्टीची साक्ष आहे. या नोकरांची नेमणूक विलाय- तेस परीक्षा घेऊन तीत उतरलेले लोकांस गुणबाहुल्याप्रमाणे निवडून करतात. ह्या परीक्षेत बसण्यास जातिधर्माचा अडथळा जरी कायद्याने काढून टाकला आहे तरी त्या नौकरीत एतद्देशीय लोकांचा प्रवेश झाला नाही. त्याची कारणे:- (१) परीक्षा देण्याचे स्थान ( विलायत ) फारच लांब पल्यावर आहे. (२) तिचे तयारीसाठी व परीक्षा दिल्यानंतरही त्याच देशांत रहावे लागते. (३) ते काम मोठे खर्चाचे, ह्मणजे निदान एक हजार पाउंड ( सुमारें १७।१८ हजार रुपयांचे ) आहे. [४] तो खर्च केला तरी परिक्षेत उतरणे अनिश्चित असते. एतद्देशीय लोकांचा वरिष्ठ दर्जाचे नोकरीत प्रवेश न झाल्याने होणारे परिणाम असे आहेत की [१] सुशिक्षित लोकांची मनें असंतुट होतील; [२] सरका- रांनी जातिधर्माचे कारणाने भेदाभेद मानला जाणार नाही असें वचन देऊन तें मोडलें असें वाटेल व त्यापासून सरकारचे न्यायप्रियतेस बाध येईल. असें हो- ईल असें लार्ड लिटन व लार्ड आर्गाइल यांनी कबूल केले आहे. ही स्थिती सुधारण्यास लोकपक्षाकडून उपाय सुचविण्यात आले आहेत ते- [१] सिव्हिल सव्हिसची पहिली परीक्षा हिंदुस्थानांत घ्यावी व उतरलेले सर्व उमेदवारांची गुणांचे संख्येप्रमाणे एक यादी करावी व त्यानंतर त्यांस कांहीं मुदत विलायतेंत ठेवावें. [२ ] कांही जागांसाठी परीक्षा हिंदुस्थानांत व्यावी. या उपायांचे समर्थनार्थ कारणे:-सन १८६७ साली इंडियाकौन्सिलांचे सभा- सदांची एक कमिटी यावद्दल विचार करण्यासाठी नेमण्यांत आली होती तिने पहिला उपाय पसंत केला आहे व दोन्ही देशांत परीक्षा घेण्यास अड- चणी येणार नाहीत असे सांगितले आहे. तसाच अभिप्राय फासेटसाहेव व लार्ड डवी यांनी दिला होता. लंडन येथील विश्वविद्यालयासंबंधाने परीक्षा इंग्रजी अमलांतील अनेक देशांत व या देशांत कलकत्ता येथे होतात; तोंडी परीक्षे- संबंधाने काही अडचण येण्यासारखी आहे, परंतु ती परीक्षा विक्षेष महत्वाची नाही व अशा किरकोळ अडचणींचे कारणाने राज्यव्यवस्थेचे संबंधाचे असे महत्वाचे प्रश्नास मोडता येऊनये. पब्लिकसहिंसकमिशनने या प्रश्नाबद्दल विचार करून ती परीक्षा या देशांत घेऊं नये असा अभिप्राय दिला आहे,