पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दिन पाहिजे. उभयतांचा मतभेद झाला तरी स्टेटसेक्रेटरींचे मताप्रमाणेच निकाल लागण्यांत येतो; मात्र खर्च करण्यासंबंधाने किंवा काही मिळकतीची विल्हेवाट करण्याची असल्यास त्यासंबंधाने हुकूम करावयाचा तो कौन्सिलांतील बहुमत त्यांस अनुकूल असल्याशिवाय करण्याचा अधिकार स्टेटसेक्रेटरीस नाही. नेहमींचे राज्यव्यवस्थेचे खर्चासंबंधाने आहे. विशेष प्रसंगी कौन्सिलास न विचारतां खर्च करण्यास मंजुरी देण्याचा अधिकार त्यांस आहे. परराष्ट्रावरो- वर व्यवहार, युद्ध किंवा तह करणे, संस्थानांशी व्यवहार कसे प्रकाराने ठेवा- वा हे ठरविणे, ही कामें व ज्यांत गुप्तपणा ठेवणे जरूर आहे अशी कामें स्टेट- सेक्रेटरी आपले अधिकारांतच करितात. वाकीचा व्यवहार कौन्सिलापुढे येऊन त्यांचे विचाराने चालतो. वेगळाल्या खात्यांची कामें करण्यासाठी या कौन्सिलां- तील सभासदांच्या कमिय्या केलेल्या असतात व प्रत्येक खात्याचे कामासाठी वेगळाले सेक्रेटरी असतात. राणीसरकारांनी या देशाचा राज्यकारभार आपले हाती घेतल्यापासून वि- लायतसरकारचा हिंदुस्थानचे कारभारांत जास्त हात शिरला आहे व ते वाज- वीपेक्षां फाजील ढवळाढवळ करतात अशी काही लोकांची तकरार आहे. यास पूर्वीपेक्षा वस्तुस्थिति पुष्कळ बावतीत पालटली आहे, हे विशेष कारण आहे. पार्लमेंट सभा पूर्वीपेक्षां हिंदुस्थानचे कारभारांत जास्त लक्ष घालू लागली आहे, व विलायतेतून या देशांत भांडवलही फार आले आहे, यामुळे आतां हिंदुस्थान- सरकारास पुष्कळ वाबतीत आपले अधिकारांत हुकुम करतां येत नाहीसे झालें आहे, तरी साधारणतः राज्यकारभाराचे कामांत उगीचचेउगीच विलायतसरकार ढवळाढवळ करीत नाही. स्टेटसेक्रेटरी हे आपण होऊन कोणतीही नवीन गोष्ट उपस्थित करीत नाहीत असा सांप्रदाय आहे. (३) समकालीन परीक्षा-हिंदुस्थानचे राज्यकर्ते हे मोठे उत्कृष्ट प्रमाणिक, शुद्ध व उदारधी आहेत असें हिंदुस्थानांतील एका मोठे नामांकित सुधारणाग्रणीचे मत आहे. या देशाचा अलीकडील इतिहास जो निःपक्षपात- बुद्धीने वाचील त्याचाही अभिप्राय तसाच झाल्यावांचून रहाणार नाही. आतां तें परकीय सरकार आहे, त्यास या देशांतील लोकांचे रीतीभाताचे, विचार- सरणीचें, व मनोधर्माचे यथातथ्य ज्ञान त्यांचे जनसमाजापासून अलग राह- ण्याने व स्वयंमन्यतेने होत नाही, यामुळे काही प्रसंगी गैरसमज होतो; त्याच कारणामुळे त्यांचा एतद्देशीयांवर विश्वासही एकदम बसत नाही, यामुळे राज्य- व्यवस्थेत काही अडचणी येतात. ह्या गोष्टी वजा केल्या तरी वर जे त्यांचे गुण- वर्णन केले आहे त्यांत कमीपणा येणार नाही.