पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३१) रीस हिंदुस्थानचे स्टेट सेक्रेटरी यांणी समकाली परिक्षा घेणे शक्य व उचित नाही, परंतु राज्य व्यवस्थेचा सुरळीतपणा व ब्रिटिश राज्याचे स्वास्थ्य ह्यांचा विचार करून जितक्या जागा देववतील तितक्या प्रामाणिक व हुषार असे ने- टिव्ह लोकांस देण्यात याव्या असा ठराव केला. लास त्यानी कारणे अशी दिली आहेत की, दोन्ही देशांत एक वेळी परिक्षा घेण्यास अडचणी फार आहेत; एज्युकेशन कमिशनने असे प्रकाराने दोन ठिकाणी परिक्षा घेऊ नयेत असे ठरविले आहे; व त्यांतील तीन नेटिव्ह सभासदांस हा विचार पंसत पडला नाहीं तरी एकंदरीत कमिशनच्या शिफारशी इष्ट हेतू सिद्धीस जाण्यासारख्या होत्या ह्मणून यानी आपला विरुद्ध अभिप्राय दाखल केला नाही: एकंदरीपैकी ६१२ जागां वर नेमण्यास प्राव्हिन्शिअल सव्हिस पैकी लोक योग्य आहेत असें ह्मणता येईल, या ६१२ जागांपैकी ९३ जागा प्राव्हिन्शिअल सव्हिसमध्ये दाखल कर- ण्यांत आल्या आहेत. राज्य व्यवस्थेचे कामासाठी काही ठरीव संख्या युरोपिअन लोकांची असलीच पाहिजे व हल्ली ठरविण्यांत आली आहे. त्या पेक्षा त्यांची संख्या कमी करितां येत नाही; परिक्षेस येण्याचे वयाची मर्यादा वाढविण्यांत आली आहे; कांपिटिटिव्ह परिक्षा या देशांत घेतल्याने नौकरीतील वरिष्ठ जागां- वर नेमण्यास जसे गुण संपन्न लोक पाहिजेत तसे व पूर्वपीठिका व जाति यांचे संबंधाने लोकांचा त्यांचेवर विश्वास बसलाच पाहिजे असे लोक नौकरीत येणार नाहीत; शीख मुसलमान व दुसरे जातीचे लोक, ज्यांचे अंगी चांगले प्रकारचे मनः स्थैर्यादिगुण असतात व ज्यांनी पूर्वी राज्य केले आहे, परंतु ज्यांना विद्या व्यासंग कमी, असे लोकांपासून सरकारास राज्य कारभारांत जी चांगली मदत घेतां येण्यासारखी आहे ती नाहीशी होईल. नौकरीत तावून सुलाखून पाहिल्याने मनुष्याची उत्कृष्ट प्रकारची परिक्षा होते; शिवाय आतां परिक्षा घेण्याचे ठरवि- ल्यास प्राव्हिन्शिअल सव्हिस मधील लोकांस जी अलीकडे आशा लागली आहे तिचा भंग होईल वगैरे. सिव्हिल सव्हिसचे हल्लींचे स्थिती संबंधाने विचार पाहतां जाग्याची संख्या सन १८७४ साला पासून शेकडा २२ कमी झाली आहे, व आणखी आरा कमी होण्याचा संभव आहे. ज्यानेवारी १८९२ त स्टाटयूटरी लोक धरून या नौकरीत ९८३ लोक होते, ८४ नेटिव लोक होते. त्यांतील पंध- रा विलायतेस काम्पिटिटिव परिक्षा देउन आले होते, व ५९ सन १८७० साल- चे कायद्या प्रमाणे नेमले होते. परिक्षा देऊन आलेले १५ पैकी १० बंगाल्यांतील विद्युत पुढारी असलेले दोन प्रमुख जाती पैकी होते, तीन मुंबईचे पार्शी, एक मद्रासचे व्यापारी वर्गापैकी व एक मुबईतील मुसलमान व्यापारी वर्गापैकी होता.