पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सन १८९३ चे प्रारंभास एकदंर सनदी नौकर किती होते वगैरे माहिती वर दिली आहे. कमिशनाने रिपोर्ट केला त्यावेळी राज्य व्यवस्थेसाठी केलेले हिंदु- स्थानचे ७६५ विभाग होते व त्यांवर सिव्हिल सव्हिस पैकी व स्टाफ कोअर पैकी व नान रेग्युलेशन प्राव्हिसेसमध्ये वरिष्ट दीस चढलेले विन सनदी नौकर असे लोक होते. या विभागांचे हद्दीत सन १८९३ चे प्रांरभी साधारण प्रमाणा- ने लोक संख्या २९७५०१ व क्षेत्र फळ १२९० मैल असें होतें. बिन सनदी नौकरींत न्याय व मुलकी खात्यांतील वरिष्ट प्रतीचे बिन सनदी नौकर २५८८ होते. त्यांपैकी २४४९ हिंदुस्थानचे नेटिव, ३५ यूरोपिअन, १०४ यूरोशिअन्स व हिंदुस्थानांतील वाढलेले यूरोपिअन लोक असे होते. या २४४९ सांत १८६६ हिंदु होतें, ५१४ मुसलमान, १८ शीक २१ पारशी, व तीस इतर धर्माचे हिंदू पैकी ९०४ ब्राह्मण ११३ वाणी, व ६०१ इतर लेखक वर्गापैकी होते. कमिश- नाने शेवटी असे सांगितले आहे की रु. १०० च्या किंवा त्यावरील पंगाराच्या जागा एकलक्ष चौदा हजार एकशे पन्नास, असून त्यांपैकी शेकडा ९७ जागांवर नेटिव लोक आहेत व शेकडा तीन जागांवर इतर लोक आहेत. राज्य व्यवस्थेबद्दल खर्च सन १८८१-८२ साली रुपये ११९४३५६० होता. व सन १८९१-९२सालों रु० १७९१३१७० होता. चालू सालच जमाखर्चाचे अंदाजांत या खर्चाबद्दल रुपये १९७९५००० घातले आहेत या सालांतील वाढ हुंडणावळ व हुंडणावळी संबंधानें मनदी व यूरोपियन नौकरांस मिळत असलेला आलावन्स ( भत्ता ) यामुळे आहे. या खर्चाबद्दल तपशील ( सन १८९१-९२ सालाबद्दलचा ) खाली दिला आहे. फिस्कल ह्मणजे वसूली खात्याचा खर्च त्या त्या जमांचे वाबीचे वर्णनाचे भागांत दाखविला आहे. ब्रह्मदेशांत खर्च वाढण्याचे कारण वरचा ब्रह्मदेश खालसा करण्यांत आला हे आहे. खर्चाचा तपशीलः (१) गव्हरनर जनरल रु. २५०८०० (२) गव्हरनर-(मद्रास रु. १२००००, मुंबई रु. १२००००)-रु. २४०००० (३) लेफटनेंट गव्हरनर ( बंगाल रु. ९६०००, वायव्यप्रांत व अयोध्या रु. ९६०००, पंजाव रु. १००७३० ( रु. २९२७३० (2) चीफ कमिशनर व सिंध कमिशनर-(आसाम रु. १४२८० मध्य- प्रांत रु, ४८०००, ब्रह्मदेश रु. ७६८००, मुंबई रु. ११८४२०) रु. २८७५०० (५) खासगी खर्च व परिवार-(हिंदुस्थान सरकार रु. २३५०२० बंगाल रु. २१६५०, आसाम रु. ३०७० वायव्य प्रांत व अयोद्या रु. ३८०२०, पंजाब