पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२६) स्थानची सिव्हिल सव्हिस व प्रांतिक सिव्हिल सव्हिस असे करण्यांत यावे, हिं- दुस्थानचे सिव्हिल सव्हिसमध्ये विलायतेंत काम्पिटिटिव परिक्षा घेऊन लोक ने- मण्यांत यावे, व त्यांची संख्या अशी ठेवावी की राज्य व्यवस्थेतील सर्व मोठा- ल्या जागा भरून काही शिकणाऊ लोक ठेवण्यास सवड राहील; स्टाँटयूटरी स- व्हिस कमी करून तिचे बद्दल प्रांतिक सिव्हिल सव्हिस स्थापन करण्यात यावी, व तीत हल्लीचे खालचे दर्जाचे नौकरींपैकी निवडक लोकांची नेमणूक करण्यांत यावी, व सनदी नौकरांसाठी राखून ठेविलेले जागांपैकी एक षष्टांश जागा वेग- ळ्या काढून त्यांवर या नौकरीपैकी लोकांची नेमणूक करण्यात यावी. वोर्ड आफ् रेव्हेन्यू, कमिशनर, चिटणीस या जागा त्या नौकरींतील लोकांस देण्यांत येऊं नयेत. लॉर्ड क्रास यांनी या कमिशनचे सूचनासंबंधाने असा ठराव केला की, सन १८७० चे कायद्याप्रमाणे प्रत्येक प्रांतांत सनदी नौकरांसाठी राखून ठेविलेल्या जागांपैकी काही जागा वेगळ्या काढाव्या व त्यांजवर प्राव्हिशिअल सरविसपैकी लोकांच्या नेमणुका कराव्या. त्यांची संख्या प्रांताचे गरजाचे व योग्यतेचे प्रमा- णे निश्चित करावी व वेगळाल्या वर्गाचे नौकरांची संख्या काय प्रमाणाने असा- वी हे वेळोवेळी ठरविण्यांत येत जावें. ही पद्धति हल्ली अमलांत आली आहे. ब्रह्मदेश व आसाम हे प्रांत विधेचे संबंधाने मागसलेले आहेत, व आसाम प्रां- तांत यूरोपिअन लोकांची वसाहत मोठी आहे, व जंगली लोकांचे प्रांत त्याचे संनिध आहेत, ह्मणून या प्रांतांत ही व्यवस्था करण्यांत आली नाही. हिंदु- स्थान सरकाराने या ठरावाप्रमाणे वेगळाले प्रांतांसाठी यादी केल्या आहेत. सन- दी नोकरीत नेमलेले सर्व लोक प्रत्यक्ष कामांवर असतात असे नाही. रजेवर जाणारे लोकांचे बदलींत काम करण्यास व शिकणाऊ ठेवण्यासाठी ह्मणून कांहीं जास्त लोक ठेविलेले असतात; गरजेप्रमाणे दर साल नवीन लोकांची भरती क- रण्यांत येते. पूर्वी या भरतीचे षष्ठांशा इतके लोक या देशांत स्टाटयूटरी म- णून नेमण्यांत येत असत, परंतु आतां जितके नौकर कामांवर असतात ह्मणजे त्यांच्या जितक्या जागा आहेत त्या जागांचे एक षष्टांशा पर्यंत जागा न्शिअल सव्हिसमध्ये सामील करण्याचे ठरविले आहे. एकंदर सनदी नौकरांचे जागांची संख्या ८९८ आहे, व त्या पैकी ७१ लोक दुसरे विशेष प्रकारचे का- मांवर आहेत. कमिशनर पेक्षां वरिष्ट प्रतीच्या जागा ४६, चिटणिशीच्या जा- गा ६६, कमिशनर ४१, जिल्हाधिपती २३४, डिस्ट्रिक्ट जज्य १११, मुलकी व न्याय खात्यांतील खालच्या जागा २७७ किरकोळ ह्मणजे शेतकी खाते वगैरेंत ४९, आशा मिळून ८२१, आहेत. यांपैकी ब्रह्मदेश व आसाम मिळून ११५ आ-