पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चा (२५) निवड करून किंवा परिक्षा घेऊन नौकर नेमण्यांत येतात. त्यांत नेटिव्ह लो- कांपैकीही काही नेमण्यांत येतात. नेटिव्ह लोकांस नौकरीत नेमण्याच्या संबंधाने गेले साठ वर्षांत पार्लमेंट सभे- ने वेळोवेळी कायदे केले आहेत. त्यांत पहिल्याने त्यांचे धर्म व जन्माची जागा वगैरेचे कारणांनी हरकती येणार नाहीत असें सन १८३६ साली ठरलें; तेंच तत्व सन १८५३ सालचे कायद्यांत व सन १८५८ चे कायद्यांत व जाहीरना- म्यांत दाखल करण्यांत आले. असे प्रकाराने जातीची व धर्माची हरकत नि- घून गेली होती, तरी सन १८७० सालापर्यंत विलायतेंत परिक्षा देऊन सनदी नौकरीत एकच इसम शिरला होता. ही स्थिती अर्थातच चांगली नव्हती मगू- न सन १८७० साली विलायतेंत परिक्षा न देतां सनदी नौकरासाठी राखून ठे- विलेले कांहीं जागांवर नेटिव्ह लोकांस नेमण्यास ३३ व्हिक्टोरिया चा० कायदा करण्यांत आला; व त्याचा हेतु खालचे दर्जाचे सरकारी नौकरीत चां- गली हुषारी दाखविलेले लोकांस त्या जागांवर नेमण्याचा अधिकार द्यावा हा होता. हा कायदा अमलात आणण्यास नियम करणे अवश्य होते, परंतु तें काम सन १८७९ पर्यंत तसेंच पडले होते. या सालापर्यंत या कायद्याप्रमाणे एक दोनच नेमणुका व त्याही जुडीशिअल खात्यांतच करण्यांत आल्या होत्या. सन १८७९ सालांत या कायद्यास अनुसरून नियम करण्यांत आले, त्यांत विशेष मु- द्दा असा ठरविला होता की चांगले मोठे कुलांतील व वजनदार इसम बुद्धिमान व शिकलेले असतील त्यांस विशेषे करून नेमण्यांत यावे, व खालचे दर्जाचे स- रकारी नौकरांपैकी किंवा धंद्यांत असलेले लोकांस अशा जागा देणे झाल्यास कांहीं विशेष गुण दिसून आला असेल तरच द्याव्या. असे प्रकारचे नियम क- रण्यांत सरकारचा हेतु असा होता की पूर्वीचे राज्य कर्त्यांचे वर्गतील लोक, जे इतर विद्याव्यासंगी वर्गावरोवर विद्या शिकून चढाई करीत नाहीत असे लोकांस नौकरीत घ्यावे; परंतु तो हेतु सिद्धीस गेला नाही. कारण असे प्रकारचे लो- कांत विद्वान व वजनदार असे लोक मिळत नसत; व असे लोक असत ते नौ- करीची पर्वा करीत नसत. मुळचा सरकारचा वेत राजकीय कारणांनी किंवा राज्य व्यवस्थेचे सोईसाठी झालेला असावा परंतु तो निष्फळ झाला, तेव्हां या बाबतींत चौकशी करून कायम निकाल करण्यास साधने मिळावी ह्मणून एक क- मिशन नेमण्यांत आले, व त्यांत नेटिव सभासदही होते. या कमिशनाने सर- कारास केलेला रिपोर्ट व त्यास अनुसरून काय तजविजी करण्यांत आल्या त्या- ची हकीकत पार्लमेंटास सादर करण्यांत आली आहे. या कमिशनाच्या मह- त्वाच्या सूचना अशा होत्या की सिव्हिल सव्हिसचे दोन विभाग, ह्मणजे हिंदु-