पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शेजारील जमिनीची सुधारणा करून धक्यावरील ट्रामगाडीची व आगगाडीची जोड घालून देणे ह्या होत्या. पाणी संथ सांपडावें ह्मणून समुद्रात १२०० फूट लांबीचे दोन धक्के बांधून सुमारे २५० एकर पाण्याचे क्षेत्र बंद करून व्यावे असें ठरले व त्या कामाल सन १८७६ साली सुरुवात झाली. सन १८८१ साली जे भयंकर तुफान झाले यांत झालेले काम सर्व ढासळून गेले. पुढे तें काम लागलीच चालू झाले व सन १८९२-९३ अखेर त्या कामावर रु. ११:४०००० खर्च झाले होते. सन १८९१-९२ सालीं जमा रु. ५७४००० व खर्च रु. ४८८५४०. सन १८९२-९३ सालीं जमा रु. ५१६००० व खर्च रु. ४९६०००. वंगाल्यांत चितागांग येथे पोर्टट्रस्ट सन १८८८ साली स्थापन झाले. त्याचे पूर्वी या वंदराची व्यवस्था जिल्हाधिपाकडे असे. या बंदरांत बहुतेक व्यापार देशांतले देशांत व्यापार करणारे गलबतांचाच होतो. सन १८९१-९२ साली जमा रु. ५९१५० व खर्च रु. ७६८२०. आसामांतील पूर्वभागांत आगगाडी होण्याची आहे ती झाली ह्मणजे या बंदराचा व्या- पार पुष्कळ वाढेल. मुंबई, मद्रास, कलकत्ता, रंगून, व कराची येथील बंदरांतून परदेशांशी व्यापार किती होतो हे पुढील कोष्टकावरून दिसून येईल व त्यावरून या बंदरांचे महत्वही कळून येईल. वरील चार शून्ये गाळून रुपयांचे आंकडे दिले आहेत. १८८३।८४ १८९११९२ १८९३।९४ मुंबई. ६५६७४ कलकत्ता. ५७३३५ रंगून. ७८१० १२६१५ १२५२५ मद्रास. ७८२३ ८९१८ ९०६८ कराची. ५०४८ ११३११ स्थानिक मंडळ्यांत कर्ज वगैरे देण्याबाबत-म्युनसिपालिट्या, लोकल- बोर्डे,व पोर्ट व हारवरट्रस्ट, या मंडळ्यांस कर्ज देण्याचे संबंधानें कशी काय पद्धति आहे हे सांगून हा भाग पुरा करण्याचा आहे. सन १८७६ सालापर्यंत वर सां- गितलेल्या मंडळ्यांस लोकोपयोगी व सार्वजनिक सोईचे कामांसाठी कर्ज सढळ हाताने देण्यात येत असे. त्या सालांत सोन्याचे मानाने रुप्याचा भाव उतरल्या- मुळे, कर्ज देण्यासंबंधाने निबंध घालावा लागला. त्यापुढे अत्यंत जरुरीचे का- मांसाठी मात्र सरकारांतून मदत देण्यात येऊ लागली; इतर प्रसंगी ह्या मंडळ्यांस बाजारांत मिळेल त्या दराने सरकारचे देखरेखीखाली, रकम कर्जाऊ घ्यावी लागे. नंतर सन १८७९ साली, लहान लहान म्युनसिपालिट्यांच्या संबंधाने तरी ,