पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

GENERAL सार्वजनिक नवजाला प्रस्तावना. हिंदुस्थानचे (सन १८९१-९२ अखेरचे) हालहवालीबद्दल सन १८९४ साली पार्लमेंट सभेस सादर झालेले रिपोर्टीचे आधारें हैं ल- हानसें पुस्तक लिहिले आहे; या विषयावरील इंग्रजी ग्रंथ व सरकारां- तून प्रसिद्ध झालेली पुस्तकें यांतून जास्त माहिती मधून मधून घालण्या- चा प्रयत्न केला आहे. इंग्रजी समजणारांस या विषयावर माहितीने प- रिपूर्ण असे अनेक ग्रंथ आहेत, परंतु मराठी जाणणारांसच ती माहिती मिळविण्यास साधन नाही. ते त्यांस प्राप्त व्हावे ह्मणून हा अल्प प्रयत्न केला आहे. राज्यव्यवस्था व लोकस्थिति या विषयासंबंधाने सरकारची मतें लोकपक्षास सर्वस्वी संमत नाहीत ह्मणून काही वादग्रस्त मु- द्यांचे संबंधानें लोकमत काय आहे तेही या पुस्तकांत थोडक्यांत दाखल आहे. हे पुस्तक लिहिण्याचे व माहिती देण्याचे कामी माझे मित्रांनी व सद्गृहस्थांनी माझे विनंतीवरून मोठे आनंदाने मदत केली आहे, त्याबद्दल मी त्यांचा फार ऋणी आहे. पुस्तकाचे सुंदर छपाईबद्दल सर्व श्रय रा. रा. पाडुरंगराव शिराळकर आणि मंडळी यांस आहे. ग्रंथकर्ता