पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/४३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

PEMERAL 3267. NATIVA सार्वजानेका खेड, (.) (४१८) मांग एकविसावा. एतद्देशीय संस्थाने. येथपर्यंत हिंदुस्थानचे एका भागाचें ह्मणजे इंग्रजांचे खास अमलांतील प्रांतांचे राजकीय व सांपत्तिक स्थितीचे संक्षिप्तसें वर्णन झाले. आतां एतद्देशीय संस्थानां- चा विस्तार, त्यांची लोक संख्या व जमाबंदी या संबंधाने माहिती देतो. प्रथ- मतः हिंदुस्थानचे सरहद्दीवर असलेले संस्थानांचे संबंधाने थोडी हकीकत देऊन, नंतर एतद्देशीय संस्थानांचे संबंधाने कोष्टक देण्यात येईल. हिंदुरथानचे वायव्य सरहद्दीवर अफगाणांचे राज्य आहे. ह्या राज्याबरोबर इंग्रज सरकारचे जे वर्तन आहे त्याचे मूलतत्व ह्मणजे, रशियाचे या देशास येण्याचे वाटेवर एक चांगले शूर, बलाढ्य व आपल्याशी स्नेहाने वागणारे असें एक स्वतंत्र राज्य ठेवावें हे आहे. प्रसंग पडल्यास हिंदुस्थानचे वतीने शत्रूशी लढण्यास तयारी असावी ह्मणून सैन्याची जैयत तयारी ठेवण्यासाठी अमीरास काहीं मदत देण्यात येते. अफगाणिस्थानाचे दक्षिणेस बलुचिस्थानांत खिलात हे संस्थान आहे; त्याचे खानाबरोबर तह झाले आहेत. त्यांत त्याने इंग्रज सरका- रचे वर्चस्व कबूल केले आहे व परराज्याबरोबर संबंध इंग्रज सरकारचे मार्फ- तीने ठेवण्याचेही पतकरलें आहे. लासबेला खरण ही संस्थाने व मक्राण प्रांतांतील केज, पजगर ही संस्थाने खानाचे आश्रित आहेत. बलुचिस्थानापैकी कांहीं प्रांत, ज्यास ब्रिटिश बलुचिस्थान असें ह्मणतात, तो इंग्रज सर- कारचे ताव्यांत आहे; यापैकी काही भाग खिलातचे खानापासून काही शर्तीवर इंग्रज सरकारांनी वहिवाटीस घेतला आहे व काही भाग अफगा- णिस्थानाचे लढाईत मिळाला आहे. ब्रिटिश बलुचिस्थान व पंजाब यांचे दरम्यान मरी व बगटी जातीचे लोक रहातात. ते इंग्रज सरका- राबरोबर केलेले प्रमाणे वागत आहेत. वायव्येकडील सरहद्दीवर पंजाब व अफगाणिस्थान यांचे दरम्यान जो डोंगरी भाग आहे, त्यांत उत्तरेस । पेशावर, सरहद्दीवर स्वाती, युसफझई, गडुन, मोहमंड, अफ्रिडी, ओरकझई, झैमुक्त व तुरी या जातीचे लोक रहातात; सरहद्दीचे दक्षिण भागांत वझिरी, दवारी, बटनी, शिराणी या जातीचे लोक राहतात. या लोकांचे मुख्यांपासून गुन्हे न करण्याविषयी व इंग्रजांचे शत्रूस आश्रय न देण्याविषयी करारनामे करून घेतले आहेत. आफ्रिडी, ओरकझई, वझिरीपैकी महसूद, बटनी करारा