पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/४३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४१७) आहे ते दिसून येईल. हा माल तयार करण्यासाठी कच्चा मालही बराच या दे- शांतून गेलेलो असतो. असे प्रकारची व्यापाराची स्थिति झाल्याने किती नुकसा- न होत आहे त्याचे अनुमान करणे कठीण आहे. फक्त कापूस जातो त्याचे बदला त्या कापसाचे कापड पाठविले तर या देशास ३० कोटी रुपये नफा राही- ल असा अजमास आहे. एकंदरीत तयार करण्यासाठी कच्चा माल, ताग, रेशीम वगैरे सारखा पाठविण्यांत येतो त्याचा पक्का माल करून पाठविला तर नफा सुमारे ५० कोटी रुपये होईल असे धरले तरी चूक होणार नाही. या परस्वाधी- नतेने पैशाचंच नुकसान होते असे नाही. एकंदरे देशांतील लोकांत सर्व प्रकारे दुर्बलता व निरुत्साह शिरला आहे हे मोठे घातुक नुकसान होत आहे; पूर्वी जसें सर्व धंदे प्रमाणशीर व्यवस्थेनें चालत असत ती स्थिति नाहीशी झाली आहे, सर्व लोकांस कायतो एकच धंदा आश्रय करण्यास राहिला. कारागीर लोकांस ज्यांत त्या ज्ञानाची जरूर नाही असे शेतकन्चेि धंद्यात जावे लागल्यामुळे त्यांची प्राप्ति कमी झाली, व त्याचा परिणाम असा झाला की, मध्यम वर्गात द्रव्यसंचय होण्याचा मार्ग खुंटला, व वाढत जाणारे प्रजेचे जीवनाचा मार्ग संकुचित झाला व एकंदरीत देशाचे सामाजिक, सांपत्तिक व नैतिक स्थितीवर फार अनिष्टकारक असा परिणा- म झाला आहे. ह्या प्रमाणे सर्व लोकांची शेतकीवर भिस्त पडल्याने शेतकी कांहीं वाढली आहे, परंतु हा क्रम बरीच वर्षे चालला आहे तरी शेतकी रीतीत काही सुधारणा सांगण्यासारखी झालेली नाही. शेतकीचा माल परदेशी जातो त्या पासून शेतकऱ्यांस सुमारे चार कोटी रुपये फायदा राहतो असा अजमास आहे, परंतु शेतकऱ्यांची जी मोठी संख्या वाढली आहे तीवर हा नफा वाढला ह्मणजे माणशी चार आणे पडतील किंवा नाही याचीही शंका येते. इकडील माल ची परदेशांत छाप बसली हाच कायतो या व्यापारापासून खरा फायदा झाला आहे. एकंदरीत सर्व देशांशी संबंध जुळणे, व्यापाराची वृद्धि होणे, इकडील मालाची परदेशांत छाप बसणे वगैरे गोष्टी व्यापारासंबंधाने फायद्याच्या झाल्या आहेत ; दुसरे वाजूने हा व्यापार परकीयांचे हाती असणे, या देशांतील सर्व उद्योगधंदे बुडणे व त्यामुळे दारिश्च वाढणे ह्या तोट्याच्या गोष्टी आहेत. अलीकडे या तोट्याच्या वाजूकडे लोकांचे लक्ष लागत चालले आहे व कच्चया मालाचा तयार माल होऊन पूर्वीपेक्षा आतां जास्त जाऊ लागला आहे ही गोष्ट समाधान मानण्यासारखी आहे. व्यापाराचे उन्नतीचे कामांत इंग्रजांचे सारखे व्यापाराचे, कारागिरीचे, जुटीचे, दीर्घोद्योगाचे व छातचेि कामांत निष्णात असे लोकांचे उदाहरण अनु- करणास पुढे आहे हीही या देशांतील लोकांस असामान्य सुदैवाची गोष्ट आहे. २७