पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/४३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४१६) 4 या देशांतील आगगाडीचे रस्ते एतद्देशीयांचे नाहीत, त्यांतील फार थोडे भां- डवल मात्र या देशांतील आहे. माल नेण्याआणण्यास जी समुद्रातील याने आहेत तीही बहुतेक परकीयांची आहेत. एतद्देशीयांचे गलबतांचे टनेज (गल- वतांत किती टन माल राहील त्याचे मान) एकंदरीपैकी शेकडा २.१४ असें आहे. बाकी ९७.८६ भाग टनेज इंग्रजांचे व इतर राष्ट्रांचे गलबतांचे व आग- बोटींचें आहे; तसेंच आगवोटी वाढत आहेत व त्या मानाने एतद्देशीयांची गल- बतें कमी होत चालली आहेत; परदेशाशी व्यापार करणारी एतद्देशीयांची एकही आगबोट नाही. याप्रमाणे या बाबतीत परकीयांचें पाऊल झपाट्याने पुढे पडत आहे व एतद्देशीयांचे तसेंच मागे जात आहे. एतद्देशीयांचे हाती सुमारे एक दशांश व्यापार आहे व त्यांस त्या मानानेच फायद्याचा अंश येतो. या देशाचे राज्यव्यवस्थेसंबंधाने विलायतेस पुष्कळ पैसा पाठवावा लागतो व त्याबद्दल व्यापारी मालच जातो, यासंबंधाने व्यापाराचे भागांत सांगितलेच आहे. या कारणांसाठी आयात मालापेक्षां निर्गत माल जास्त पाठविणे नेहमी भाग पडतें व आयात मालाचे बदली माल पाठविणे जरूर नसतां सरकारी खर्चासाठी विलायतेस जास्त माल पाठविणे अगत्य पडल्याने व्यापाराचे नेहमीचे क्रमांत फरक पडतो व मालाचे किमतीसंबंधानेही नुकसान होते. ह्या सर्व बाबतीत होणारे तोटे हे या देशांतील लोकांस सहन करण्यास जड जाते, याचे कारण या देशांतील धंदेरोजगार बसले आहेत हे आहे. या देशांतून माल जातो तो सर्व कच्चा माल व धान्ये असा असतो; तयार माल फार थोडा जातो. येणारा माल तयार केलेला असतो; तयार माल जितका जास्त येत जातो त्या मानाने इकडील बंदे बसत जात आहेत, हे वर सांगितलेच आहे. सर्व उद्योग व का- रागिरीचे धंदे जाऊन शेतकी हाच एक धंदा राहिल्याने लोकांची हल्लींची निकृष्ट स्थिति झाली आहे हे फ्यामिन कमिशननें फार स्पष्टपणाने सांगितले आहे. कमिशनर असें ह्मणतात की "हिंदुस्थानांतील लोकांची दरिद्रावस्था असण्यास व दुष्काळाचे वेळी त्यांचे फार हाल होतात त्याचे मूळकारण बहुतेक सर्व लोकांस शेतकी हाच एक धंदा राहिला आहे हे आहे ; वरची संकटें टाटण्यास मुख्य उपाय झणजे शेतकीवर न लागतां रिकामे राहिलेले लोकांस उद्योगधंदे किंवा कामें मिळण्याची सोय झाली पाहिजे. ही सोय झाल्याशिवाय दुसरे कोणतेही धंदे उपाय केले तरी हल्ली होत असलेले लोकांचे देनेचा पूर्ण प्रतिकार होणार नाही.” आयात मालाची यादी तपासली झणजे किती विविध प्रकारचा तयार माल येत आहे व किती गोष्टींचे संबंधानें (आगकाड्या, चटयापासून तों यांत्रिक सामानापर्यंत) हा देश परतंत्र झाला ह्या लोकां-