पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/४३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४१५) व्याज दिल्याशिवाय मिळत नाहीत. भांडवल थोडें, आहे त्याचा उपयोग व्यापारधद्यांत होत नाहीं; कारण समाईक भांडवलाच्या पेढ्या काढून पत वाढविण्याची वहिवाट नाही. या बाबतीत मद्रास इलाख्यांत व्यांका काढून पैशाची देवघव करण्याची वहिवाट चांगली सुरू झाली आहे. कारागीर धंदै- वाले लोकांसही समुच्चयाने काम करण्याची संवय नाही ; त्यांस आश्रय नाहीं- सा झाला आहे. एकंदरीत देशाची विपन्नावस्था होण्यास उद्योगधंद्यांचा हास हेच एक प्रधान कारण आहे. येथपर्यंत शेतकी व उद्योगधंदे यांचे संबंधाने देशाची स्थिति कशी आहे तें सांगितले. आतां व्यापाराचे योगाने देशस्थितीवर कसे परिणाम झाले आहेत त्याबद्दल काही विशेष लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत व ज्यांचेमुळे देश- स्थितीवर विशेष प्रकारचे परिणाम झाले आहेत त्या देतो. चवदावे भागांत व्यापाराची हकीकत दिली आहे, तीवरून व्यापाराची अतिशय वृद्धि झाली आहे व व्यापार सर्व देशांबरोबर होत आहे हे सहज ल- क्षांत येण्यासारखे आहे. व्यापाराचे दृष्टीने ही गोष्ट फार मोठी महत्वाची व अतिशय फायद्याची झाली आहे व ती घडून येण्यास या देशाच्या व्यापारांत निष्णात असा जो इंग्लंड देश त्याशी संबंध होणे हेच मुख्य कारण आहे ; त्या देशाचे मदतीशिवाय ह्या गोष्टी घडून येण्यास फार काळ लागता. या देशाचा सर्व देशांशी व्यापाराचे बाबतींत संबंध राहिल्याने सर्व जगाचे व्यापारांत या देशासही भाग मिळतो. ही गोष्ट राष्ट्रोन्नतीस महत्वाची आहे, कारण कोणतेही देशाची अर्जित दशा होण्यास एकल- कोंडेपणाने राहून चालत नाही. या देशांत फ्री ट्रेडची (अप्रतिहत व्यापाराची) तत्वें लागू असल्यानेही व्यापारास (फक्त व्यापाराचे दृष्टीनेच पहातां) फार उपयोग झाला आहे. परदेशांत ज्यांचा खप विशेष आहे असे नवीन पदार्थ चहा, काफी वगैरे यांची लागवड इकडे इंग्लिश लोकांचे भांडवलाने व कर्तृत्वाने सुरू झाली आहे. गाडीरस्ते व आगगाड्या यांचा विस्तार झाल्याने ही व्यापाराचे वृद्धीस मदत झाली आहे. या सर्व कारणांमुळे व्यापाराची वृद्धि होऊन या देशांत उत्पन्न होणारे कच्चे व तयार झालेले मालाचे खपासंबंधाने हा देश मोठाले राष्ट्रांचे बरोबरीने टक्कर देऊ लागला आहे. हा व्यापार वाढ- ण्यास कारणे काय झाली ती व्यापाराचे भागांत सांगितलीच आहेत. आतां या व्यापारापासून या देशावर कसा परिणाम झाला आहे ते पहाण्याचे आहे. या देशाचा परराष्टांशी जो व्यापार होतो तो सर्व माल तयार होतो त्या ठि- काणापासून तो ज्या देशांत खपतो त्या देशांत जाईपर्यंत परकीयांचे हाती आहे. .