पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/४२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४१४ ) %3 शहरांत जे धंदेवाले लोक आहेत त्यांस साधारणपणे काम मिळते, परंतु खेडेगांवांतील कारागीर व धंदेवाले लोक यांचे काम गेल्यामुळे त्यांस सालांतून पुष्कळ दिवस मोकळे रहावे लागते. व्यापारी व दुकानदार यांचे साधारण बरें चालते. मजुरदार लोकांची स्थिति वाईट आहे, त्यांस शेतकीचे मजुरीशिवाय दुसरा मोठा धंदा राहिला नाही व तो धंदा सालांतून काही मुदतच चालतो. वागाइतीवर मात्र सारे स ल मजुरी मिळण्यासारखी असते व शेतकरीही सर्व वेळ कामावर राहतात; परंतु जिराईती शेतकी करणारे शेतकरी व मजूरदार हेही सालांतून बरेच दिवस मोकळे राहतात. काही गाडीचा धंदा करतात, परंतु तो फार थोडे. लोकांस पुरतो. याप्रमाणे धंदेवाले व मजुरदार लोक काम कर- ण्यास समर्थ असूनही काम नसलेमुळे रिकामे राहतात. एकाच धंद्यांत जास्त लोक झाल्याने नफ्याचे मान उतरते, लोकांची उमेद कमी होते व धंदे करणारे लोकांचे आंगचे गुण कमी होतात. धंद्यांत लोक फार झाले एव- ढीच धंदेवाले व कारागीर लोकांस अडचणीची गोष्ट आहे असें नाहीं त्यांच्या अडचणी अनेक आहेत. त्यांस शास्त्रीय ज्ञान नाही, चांगल्या यांत्रिक उपकरणांचें अनकूल्य नाही ; त्या अडचणी शेतकरी, सुतार, लोहार, कोष्टी, कुंभार वगैरे सर्व लोकांच्या आहेत ; या लोकांची स्थिति वाईट होण्यास दुसरे महत्वाचे कारण ह्मणजे भांडवलाची कमताई हे आहे. भांडवल कमी आहे तें, एक तर देशांत संपत्ति कमी आहे त्यामुळे व दुसरे पतीचे कमताईमुळे. धनसंचय कमी असण्यास इंग्रजांचे राज्य होण्यापूर्वी जो गडवडीचा काळ होता त्यांत धनवित्ताला सुरक्षितपणा अगदी नव्हता व व्या- पारही नीट चालत नसे हे कारण आहे. इंग्रजांचे राज्य झाल्यापासून या दे- शांतील पैसा विलायतेस फार जात आहे ; साधारण अजमासाने देशांत जी निव्वळ शिलक राहते तिचा तिसरा हिस्सा विलायतेस जातो व त्याबद्दल व्या- पारी त-हेचा काही मोबदला येत नाही. वारंवार दुष्काळ पडतात त्यामुळेही धनसंचय होण्यास हरकत होते. सरकारी देण्यांतही बरीच रकम झणजे निव्कळ शिलक राहते त्यांतील सुमारे निम्मे जाते. द्रव्यसंचय करण्यास समर्थ असे जमीनदार वगैरे मोठाले इष्टेटवाले, जास्त पगाराचे सरकारी नौकर, वकील, डाक्तर, परदेशाबरोबर व्यापार करणारे व्यापारी, पेढीवाले, मोठे कार- खानदार व चांगले उंची कारागीर हेच आहेत. या लोकांची संख्या लहान आहे. कारागीर व मजूरदार लोकांची व शेतकऱ्यांची स्थिति वर सांगि- तलीच आहे, त्यांचे जवळे धनसंचय होणे मुळीच शक्य नाही. या लोकांस धेयांत घालण्यास स्वतःचे पैसे नाहीतच व त्यांस लोकांकडून ही पैसे जबर