पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/४२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४१३) ण्यास जें ज्ञान व ऐपत पाहिजे ती अनुकूल नाहीत. कोळशाच्या खाणी सर्व पर- कीयांचे हाती गेल्यास, हलींचे मन्वतरांत देश सधन होण्यास में एक मुख्य सा. धन कोळसा तो नाहीसा होईल. ( 3 ) व्यापारासंबंधाने पाहूं गेले असतां तो मूळ परकी यांनीच वाढविला असल्यामुळे, तो सर्व व्यांचेच हातांत आहे; फक्त एक दशांश व्यापार मात्र एतद्देशयिांचे हातांत आहे. परदेशांस ज- लमार्गाने माल नेण्या आणण्याची याने ही परदेशीय लोकांचीच आहेत. देशांतले देशांत व्यापार कसा चालतो ते पाहूं गेले असता असे दिसते की, आगगाड्यांचे द्वारेंच हा सर्व व्यापार चालतो; त्या चालू करण्यास भांडवल बहुतांशी परदेशीयांचेच आहे, त्याचे व्याज व होणारे उत्पन्नही सर्व परकीयांसच मिळतें. बंदरोबंदरी व्यापार करणारे परदेशीय व्यापारी देशांतही व्यापार करू लागले आहेत व या देशांतील लोकांत एकीचा अभाव व भा- गीने व्यापार करण्याचे अज्ञान आहे या मुळे त्यांचा ( परकीयांचा ) व्यापार वाढत आहे. या संबंधाने जास्त विचार पुढे करण्याचा आहे. (४) परकीयांचे चढाओढीचा परिणाम विशेषतः इकडील सर्व प्रकारचे कारागिरचे धंद्यावर झाला आहे. परकीय तयार माल इकडे येण्याचे योगाने इकडील धंद्यांचा न्हास झाला आहे व त्या तयार मालाचा व्यापार जसा वाढत गेला त्या प्रमाणानें देशी कारागिरांचे धंदे बसत गेले आहेत. हे धंदे बसल्यामुळे परकीय लोकांस या देशांत कारखाने काढण्यास मदत झाली आहे. ही दोन प्रकाराने झाली आहे. एक तर इकडील कारागीर लोक मोडले गेल्याने त्यांचेबरोबर चढाओढ कर. ण्यास कोणी राहिले नाही व दुसरे कारागीर लोक मोकळे झाल्याने मजुरी स्व- स्ती झाली आहे. ह्या परकीय पद्धतीचे कारखान्यांनी मजुरी मिळते हा एक फायदा आहे, तरी तो फायदा फार थोडे किमतीचा आहे, कारण तसे कारखा- न्याने फार कारागीर धंदेवाल्यांचे धंदे वसतात व त्याप्रमाणे मजुरदार वर्गास मजुरीही मिळत नाही. या कारखान्यांपासून एक फायदा आहे तो मात्र महत्वा- वा आहे, तो असा की, परकीयांचे कारखाने इकडे झाल्यामुळे त्यांचे अनुकरणाने इकडील लोक इकडील भांडवल घालून तसे कारखाने काढू लागले आहेत. इकडील व्यापारधंदे बुडाल्याने व ते सर्व परकीयांचे हाती गेल्यामुळे धंदे- वाले व कारागीर लोक मोडकळीस आले आहेत असें वर सांगितलेच आहे, त्या संबंधाने आतां विचार करण्याचा आहे. धंदे गेल्यामुळे स्थिति मोठी विपरी- त झाली आहे-लोक तर वाढत आहेत व त्यांस धंदेरोजगार कमी होत जात आहेत. धंदे कमी झाले तरी त्यांत सुधारणा हे ऊन थोड्या कामाणसून जास्ती प्राप्ती होण्याचे साधन झाले असते, तर ठीकच परंतु तसे काही झाले नाही.