पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/४२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४१२) , यावरून किती लोकांचे सामर्थ्य व्यर्थ जात आहे याची कल्पना होण्यासारखी आहे. या निरुद्योगीपणाचा परिणाम असा होत आहे की, लोकांत आलस्य भरत आहे व तो दुर्गण एकदां शिरला ह्मणजे निघण्यास फार जद जाते. वाढत जाणारे लोकसं ख्येस अत्रसंग्रहाची वाड कशी होईल हा प्रश्न तर महत्वाचा आहेच, परंतु यापेक्षाही रिकामे लो सि कामधंदा कसा मिळेल हा प्रश्न विशेष महत्त्वाचा आहे. शेतकी वाढण्यास विशेषशी सवड नाही, तेव्हां आतां पिके करण्याची तन्हा पालटून जमिनीपासून जास्त उत्पन्न येईल असे करून शेतकीची वाढ केली पाहिजे. देशाचे बरेच भागांत पर्जन्याचे मान कमी आहे व त्यामुळे दुष्काळ वारंवार पडतात. व त्यांचा परिणाम लोकांवर विशेष जबर होतो तो फार लोक काम- धंद्यावांचून रिकामे असल्यामुळे होतो, असा फ्यामिन कमिशनचा अभिप्राय आहे. शेतकी वाढणे ती वागाईत वाढून झाली पाहिजे. ज्या भागांत पर्जन्याचे अनिश्चितपणामुळे जमिनीस कृत्रिम उपायांनी पाण्याची सोय होणे जरूर आहे असे जमिनीपैकी सुमारे एक पंचमांश जमिनीत बागाईत होत आहे. यासंबंधानें ही लोकांचा स्वपराक्रम कांही दिसत नाहीं; बागाईत होत असलेले जमिनीपैकी का- यते जमिनीत खासगी विहिरीतून पाणी मिळत आहे; बाकीचे सर्व बागाईत सर- कारांनी प्राप्त करून दिलेले पाण्याने होत आहे. जमिनीतून पिके काढून घेतली व तीत खत वगैरे घातले नाही तर तिचा कस कमी होत जातो. जमिनीची सुधारणा करण्यास शेतकरी लोकांस सामर्थ्य नाही व सुधारणा करण्यास त्यांस उमेद येण्यासारखी काही कारणे नाहीत. सुधारणा केल्याने जो फायदा होतो तो सर्व आपल्यास अनुभवण्यास सांपडेल असा भरंवसा असल्याशिवाय को- णासही ती करण्यास इच्छा होणार नाही. तसा फायदा पूर्णपणे मिळण्याचा संभव किंवा भरंवसा साऱ्याचे दर जेथे वारंवार पालटणार तेथे राहणे कठीण आहे. ज्या प्रांतांत जमिनदारी पद्धती चालू असून जमिनीवरील स्वत्व खासगी इसमांचे आहे असे बंगाल प्रांतांत जमीन करणारे फार झाल्याने त्यांस लहान लहान पट्या मिळतात व चढाओढीनें साराही फार चढतो; याचाही परिणाम वरचे सारखाच होतो. या कारणांमुळे जमिनीची सुधारणा होण्यास हरकत होते. एकंदरीत शेतकी जी परकीयांचे हाती न जातां शिलक राहिली आहे, तिची ही स्थिति समाधानकारक नाही. (२) खाणींचा सर्व धंदा परकीयांचे हाती आहे. पूर्वी तो धंदा करणारे धावड वगैरे लोक होते ते सर्व नाहीसे झाले आहेत. कोणतेही धंद्यांत परकी- यांस चहा ओढीची भीति राहिली नाही, कारण इकडील लोकांस ते चालवि-