पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/४२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४१) न येतां कोपऱ्यात पडल्यासारखे झाले आहेत. अजून देशी व्यापार व कला- कौशल्यांचे पूर्ण निर्मूलन झाले नाही तो पर्यंत त्यांची स्थिति सुधारण्यास प्रयत्न झाल्यास उपयोग होण्यासारखा आहे. आतां परकीयांचे हाती इकडील धंदे किती गेले आहेत ते पाहण्याचे आहे. (१) परकीयांचा प्रवेश ज्यांत विशेषसा झाला नाही असा धंदा फक्त शेतकीचाच उरला आहे. या धंद्यांत ही इंप्राजांनी जमीनदाऱ्या खरेदी करून पडावें असें सर जे. केअर्ड यांनी सुचविले आहे, तेव्हां या बाबतीत ही भीति बाळगण्यास कारण झाले आहे. शिवाय या धंद्याचीही स्थिति उमेद येण्या- सारखी नाही. काही भाग शिवाय करून सर्व प्रांतांत लागवडीस येण्यासारखी सर्व जमीन लागवडीस आली आहे. मध्यप्रांत, सिंध, ब्रह्मदेश व पंजाब या प्रांतांत मात्र ह्मणण्यासारखी लागवडी लायक जमीन शिलक आहे. साधारणपणे सर्व प्रांतांत लागवडीस येण्यासारखी जमनि शिलक आहे ती हल्ली लागवडीस असलेले जमिनीचे प्रतीची नाही. यापुढे पड जमीन जास्त लागवडीस असल्यानें- ही तोटेच आहेत; कारण त्यामानाने गुरचरणीस जमीन कमी राहत जाईल व जंगल ही कमी होत जाईल. इतर धंदे नाहीसे होऊन शेतकीकडे लोकांची ओढ झाल्याने प्रत्येक कुळास जमीन फार थोडी पडते व तिचे पासून उत्पन्न होतें त्यांतून परदेशास धान्य रवाना होऊन बाकी शेतकऱ्याचे खर्चास पुरेसें धान्य शिलक रहात नाही. शेतकीयर तरी सर्व मजुरदार लोकांस मजुरी मिळते असें नाही. या संबंधाने सर जेम्स केअर्ड, फ्यामिन कमिशनपैकी एक सभासद असें ह्मणतात की- " दुसऱ्या देशांचे मानाने हिंदुस्थान देश पूर्ण शेतकीवर अवलंबून राहणारा आहे, परंतु वस्तीचे मानाने लागवड फार कमी आहे. इंग्लडति व्यवस्थित रीतीने लागवड होते तेथे एक चौरस मैलास बायका, मुलें, पुरुष मिळून ५० इसमांस काम मिळते; हिंदुस्थानांत एक चौरस मैलास त्यांच्या चौपट ह्मणजे दोनशें मनुष्ये धरली तरी एकंदरीपैकी एक तृतीयांश लोकांसच काम मिळते." काम करण्याचे वेळी झणजे दिवसां, हिंदुस्थानांत जितके आळशी लोक दृष्टीस पडतात तितके दुसऱ्या कोणत्याही देशांत दृष्टीस पडत नाहीत; रस्ते, सरकारी कचेऱ्या, चौक वगैरे ठिकाणी जिकडे तिकडे उनाड व आळशी लोक आहेतच; आगगाड्यांचे स्टेशनावर देखील तमासगीर उभे असतात. दिवसां कोणतेही खेड्यांत जा, तुमच्या भोवती आळशी लोक जमतील ; अशी स्थिति असण्यास कारण लोकांस काम नसणे या शिवाय काय असणार ? " या साहेबांचे अजमासाप्रमाणे शहरें शिवाय करून बाकीचे प्रांतात जे लोक राहतात त्यांपैकी ३ लोक ह्मणजे १२ कोटी लोकोस उद्योग मिळत नाहीत; ..