पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/४२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४१०) व्यापारावर निर्वाह करतात. (हे मान सन १८८१ चे खानेसुमारीप्रमाणे आहे. सन १८९१ चे खानेसुमारीत कामकरी व त्यांचेवर अवलंबून असणारे लोक यांची संख्या सन १८८१ चे खानेसुमारीत दाखविलेप्रमाणे वेगळी दाखविलेली नाही, यामुळे पूर्वीचे खानेसुमारीचे व हल्लीचे खाने सुमारीचे आंकड्यांची तुलना करून पाहण्यास मार्ग नाहीसा झाला आहे. हल्लीचे खानेसुमारीप्रमाणे कोणते धंद्यांत किती लोक आहेत त्याचे प्रमाण या भागाचे प्रारंभी दिलेच आहे; त्या- प्रमाणे शेतकी व शेतकीची मजुरी करणारे लोक शेंकडा ५९.७९ व शेतकीशी संबंध असणारे इतर धंदेवाले लोक शेकडा २५.०५ आहेत असे दिसते. व्या- पारांत शेकडा १.६३ आहेत.) यावरून हिंदुस्थान देश हा प्राधान्येकरून शेतकरी देश आहे असें ह्मणणात ते खरे आहे. पूर्वी इतर धंद्यांत असलेले लोक आतां शेतकीवरच पडल्यामुळे शेतकीची कांहीं वृद्धि झाली आहे, परंतु ती वृद्धि स्वाभाविक नसून इतर धंदे वसल्यामुळे झाली आहे; शेतकीवरच फार लोकांचा मारा पडल्यामुळे प्रत्येक मनुष्यास लागवड करण्यास शेत फार थोडे मिळते व त्यामुळे नफ्याचे मानही कमी पडते. इंग्लंडांत व्यापार- धंदे व शेतकी यांत लोक कशा प्रमाणाने आहेत ते पुढील आकड्यांवरून दिसून येईल. शेतकीत शेकडा १४.६, कारखान्यांत ३०४, इतर धंद्यांत ५५ असे आहेत. यावरून व्यापार व धंद्यांत व शेतकीत असलेले लोकांचे प्रमाण दोन्ही देशांत किती भिन्न आहे ते दिसून येते. याप्रकारची स्थिति होण्यास इंग्रजी अंमल सुरू होण्यापूर्वी जी आपसांत युद्धे चालू होती ती अंशतः कारण आहेत; तरी पुढे हा देश इंग्रजांचे ताब्यात आल्यावर ही स्थिति सुधारण्यास योग्य प्रयत्न त्यांचेकडून झाले नाहीत हेही निर्विवाद आहे. इंग्रजांचें राज्य या देशांत झाल्यावर या देशाचे व युरोप व अमेरिका वगैरे खंडां- तील लोकांचे दळणवळण सुरू झाले. परंतु या देशांतील कारागिरांस यांत्रिक ज्ञान नसून त्या देशांतील लोक कलांत निष्णात असलेमुळे त्यांचे बरोबर या देशाचा टिकाव लागला नाही. त्यावेळी या देशांतील उद्योगधंदे व व्यापारयंत्रादि उप- करणांचे अभावामुळे युरोपांतील देशांचे मानाने हा बाल्यावस्थेत होता हाणून त्यास टक्कर देण्यासारखे सामर्थ्य येईपर्यंत सरकारचे मदतीची जरूर होती; परंतु ती त्यांजकडून मिळाली नाही इतकेच नाही तर " व्यापाराची सार्वत्रिक मोकळीक या अर्थशास्त्रांतील तत्वाचा त्यांनी अंगिकार केल्याने व आगगाड्यांचा वगैरे प्रसार करविल्याने अन्यदेशीय व्यापारासच यांचेकडून मदत झाली. परदेशीय बलवान प्रतिस्पर्ध्याशी शस्त्रहीन व एकाकी सामना करण्याचे हिंदुस्थानचे लो- कांचे आंगावर पडल्यामुळे त्यांत त्यांचा चुराडा झाला व ते व्यापार धंद्यांत पुढे