पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/४२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

, (४०९) 9. मजुरीही त्यांस पडत नाही अशी स्थिति आहे, परंतु त्यांत त्यांचा कांहीं दोष दिसत नाही. या लोकांचे उत्कर्षाचे आड ज्या गोष्टी येतात त्या ह्या आहेत : -त्यांचेबरो- वर परकीयांची फार जबर चढाओढ चालू आहे व तीत या देशांतील लोकांचा टिकाव लागत नाही, यामुळे इकडील उद्योग धंदे बसत आहेत; ते धंदे परकी- यांचे हातीं जात आहेत व धंदेवाले व कारागीर लोक मोडकळीस येत चालले आहेत. परकीयांशी चढाओढ करून टिकाव धरण्यासारखी त्यांस अनुकूलता नाही. हे प्रतिस्पर्धा करणारे परकीय लोकहीं सामान्य नाहीत, त्यांस भांडवल, यंत्रे, शास्त्रीयज्ञान व जुटीने व व्यवस्थेनें काम करण्याची संवय या गोष्टींची अनुकूलता आहे. यांपैकी कोणतेच गोष्टींची या देशांतील कारागिरीस अनुकूलता नाही. एकंदरीत या दोघांची चढाओढ ही राक्षस व मनुष्य यांतील लढाईसारखी आहे. कारागीर लोकांबरोबर दोन प्रकाराने चढाओढ होत आहे. एक परराष्ट्रीयां- बी-परदेशांतून तयार माल आल्याने तसा माल या देशांत तयार करणारे लोक उद्योग रहित हाऊन वसले आहेत व आतां कारागीर लोकांस कच्चा माल पैदा करून विकावा हेच काम राहिले आहे. देशांतील वढाओढ- या देशात परकीय त-हेचे कारखाने चालू झाल्यानेही इकडील कारागिरांचे धंदे बसत जात आहेत; या कारखान्यांत लोकांस मजुरी मिळते एवढाच कायतो फायदा आहे. ही पर- कीयांकडून होत असलेली चढाओढ कमी होण्याचे काही चिन्ह दिसत नाही. जसजशी हिंदुस्थानांत आगगाडी प्रसार पावत आहे, व तिचे योगाने व्यापारास सोय होत आहे, तसतशी परकीय व्यापाराची उन्नति व या देशांतील कारागि- रांची अवनति होत चालली आहे व त्यांस परकीयांचे बरोबर टक्कर मारण्याचे सामर्थ्य नाहींसें होत जात आहे. या लोकांची स्थिति सुधारण्यास सरकारची मदत पाहिजे, परंतु ज्या शास्त्रीय तत्वांस अनुसरून (ती या देशास उपयुक्त आहेत किंवा नाहीत याचा विचार न करतां) सरकार राज्यव्यवस्था चालवि- तात त्याचे योगाने परकीय व्यापाऱ्यांसच उत्तेजन मिळतें. याप्रमाणे अर्धशतकापेक्षा जास्त कालस्थिति असल्याने, या देशावर परिणाम असा झाला आहे की, (१) पूर्वी जसे सर्व धंदे व्यवस्थितपणाने व प्रमाण शीर चालत असत तसे चालत नाहीसे झाले, (२) एकामागून एक धंदे पर- देशीयांचे हाती गेले, (३) व या देशांतील लोकांस स्वतः च्या उद्योगाने व श्रमविभागाने व्यापारधंदे करून आपली स्थिति सुधारण्यास आशा नाहींशी झाली. एकंदर लोकसंख्येपैकी शेकडा ८६ लोक शेतकीवर, १२ धंद्यावर व २