पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/४२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४०८) साहेव ह्मणतात की शेतकऱ्यांपैकी निम्मे लोकांस पोटभर अन्न ह्मणजे कसें तें माहीत नसते. सर हंटर साहेबांचा अभिप्राय असा आहे की, चार कोटी लोक अपुरे अन्नावर असतात. एकंदरीत लोकांची प्राप्ती अगदी थोडी आहे, त्यांस खर्च करण्यास साधने नाहीत, शिलकेचे मान अगदीच मान- सिक, अशी स्थिति आहे ; पर्जन्याची आप्ति झाली की असे स्थितीचे लोकांचे फारच हाल होतात. लोकांस चांगले प्रकारे राहण्याचे सामर्थ्य नसलेमुळे त्याचा परिणाम त्यांचे शरीरसामर्थ्यावर होत आहे व वाईट अन्नावर निर्वाह करावा लागत असलेमुळे फार लोक रोगोद्भव होऊन मृत्युमुखी पडतात. या देशांतील मृत्यूचे प्रमाण युरोपांतील सुधारलेले सर्व राष्ट्रांपेक्षां शेकडा २५.३० टक्के जास्त आहे. यापेक्षा संस्थानिकांचे ताब्यात असलेले मुलखांतील शेतकऱ्यांची स्थिति चांगली आहे. फ्यामीन कमिशनचे चौकशीचे वेळी सर. पील साहेबांनी इंग्रजी अमलांतील व संस्थानिकांचे अमलांतील शेतकऱ्यांचे प्राप्तीचा अजमास केला होता त्यावरून ही गोष्ट सिद्ध झाली आहे. अशी स्थिति होण्यास काय कारणे झाली असावी, अंतर्यामी कोठे बिघड झाला आहे की ज्याचेमुळे हे परिणाम होत आहेत, हे प्रश्न स्वाभाविक रीतीनें पुढे उभे राहतात. ही स्थिति होण्यास वालविवाहादिक कारणांनी लोकसंख्या फार झपाट्याने वाढते हे कारण आहे असें पूर्वी प्रतिपादन करण्यांत येत असे, परंतु त्याचे अयथार्थत्व खानेसुमारीचे दाखल्यावरून स्थापन झाले आहे. या संबंधाने पहिले भागांत काही माहिती दिली आहे, तेव्हां त्याबद्दल फिरून येथें विचार करण्याचे कारण नाही; तरी साधारण लोक जास्त वाढतात असें ह्मणण्यापेक्षा, लोकांचे उपजीवनाची साब- ने कमी उत्पन्न होतात हे ह्मणणे जास्त सयुक्तिक दिसेल. दुसरा आक्षेप असा आहे की अशी वाईट स्थिती असण्यास लोकांचा उधळेपणा हा कारण आहे. उधळेपणा व मितव्यय यांस कांही ठरीव प्रमाण नाही. शेतकरी काही प्रसंगी प्राप्तांचे मानाने जास्त खर्च करतात हे जरी खरे आहे तरी, तो खर्च चांगले प्रकाराने राहणारे लोकांचे मानाने विशेष असा काही होत नाही. खर्च जास्त होतो असें ह्यणण्यापेक्षा प्राप्ती हवी तितकी नाही हे ह्मणणे जास्त सयुक्तिक आहे. हिंदुस्थानांत शेतकीवर मजुरी करणारे लोकांस विलायतेस किंवा फ्रान्सांत जितकी मजुरी मिळते त्याचे द्वादशांशाने मिळते. या देशांतील कारागीर लोक उधळे, अविचारी सुस्त आहत असें पूर्ण माहिती नाही असे लोक ह्मणतात; परंतु हे काही खरे नाही. कारागीर मोठे स्वकार्यदक्ष, काटकसरीनें खर्च कर- णारे, अल्पसंतुष्ट, दीर्घोद्योगी असे आहेत ; असे असून ही इतर देशांतले पेक्षा