पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/४२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तेंतील लोकांची प्राप्ती वीसपट जास्त आहे व रशियांतील लोकांची प्राप्ती देखील चौपट आहे. प्राप्तीचे विचारानंतर पुढे विचार करण्याची गोष्ट झणजे त्या प्राप्तीपैकी खर्च किती होतो ही आहे. दरमाणशीं खर्च किती लागतो हे काढण्यास साधनें नाहीत, तरी तुरुंगांत कैद्यास व लष्करांत शिपायांस व त्यांचे नौकरांस जो खर्च लागतो त्यावरून माणशी खर्च किती लागत असेल याबद्दल ठोकळ अनु- मान काढतां येण्यासारखे आहे. तुरुंगांत दरमाणशी सालाचे रु० २३ लागतात, लष्करांत दर शिपयास रु. ४२ व त्यांचे नौकरांस माणशी रु. ३० खर्च लागतो; फ्यामीन कमिशनचे वेळी सर. पील साहेबांनी माहिती मिळविली होती तीवरून शेतकऱ्यांस माणशी रु. ४० पोटास लागतात असे त्यांस दिसून आले. हा खर्च पूर्ण वयास आलेले मनुष्यास लागणारा आहे, तेव्हां मोठे व लहान वयाची मनुष्य धरून सरासरीने दर माणशी, पूर्ण वयास आलेले मनुष्यास लागेल त्याचे पाऊणपट खर्च लागेल असें धरले झणजे चालेल. या मानाने वरचे खर्चाचे तीन चतुर्थाश केले तर तुरुंगातील कैद्याचे खर्चाचे मानाने माणशी रु. १७.२, लष्करांतील शिपा- याचे मानाने रु. ३१५ व त्याचे नौकरांचे मानाने रु. २२.५ लागतील असे दिसते. वर प्राप्ती सांगितली आहे तींतून वजा करण्यास शिपाई किंवा त्यांचे नौकर यांचेच मानाचा खर्च घेणे शक्य आहे; आपले अजमासासाठी नौकराचे मानाने ह्मणजे दरसाल माणशी रु. २२.५ लागतील असें घेऊ. या खर्चाशिवाय सर- कार देणे माणशी रु. २.८ किंवा रु. २.१० पडते. कपड्यालत्यास माणशी दीड रुपया, व किरकोळ खर्च आठ आणे तरी लागतो. हे सर्व खर्च वजा जा- उन माणशी शिलक काय ती तीनच आणे राहते. शेतकीची आउतें झिजतात, गुरे मरतात, त्याबद्दल खर्च लागतो, घरदारास, सामान सुमानास, व लग्न- कायौस खर्च लागतो, या खर्चाचा वरचे हिशेबांत विचार केला नाही; हे खर्च वजा केले तर शिलक किती राहील ती उघडच आहे. ही शिलक इतर सुधार- लेले राष्टांचे शिलकेचे पासंगासही लागत नाही. वर जे खर्चाचे मान धरले आहे तें अगदी कमीत कमी धरलें आहे; अशा प्रकारच्या खाण्याने शरीराची आ- रोग्यता व काम करण्यास शक्ति ती कशी राहणार! सन १८८८ साली हिंदुस्थान सरकारांनी लोक स्थितीबद्दल तपास करून अभिप्राय दाखल केला आहे तो असा की, या देशांतील सर्व भागांत ज्यांचा चरितार्थ हातावरचे हातावर चालतो, जे नेहमी कर्जात बुडालेले असतात, ज्यांचे जवळ शिलक कांहीं रहात नाही व महर्गता झाली की ज्यांचे हाल होऊ लागतात, असे लोक पुष्कळ आहेत. सर चार्ल्स इलियट