पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/४२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४०६) दर वाढले आहेत. घरगुती चाकरीचे लोक, सुतार, सोनार वगैरे कारागीर लोक, यांचे मजुरीचे दर वाढले आहेत. इतर कारागिरांचे धंदेही चांगले चाल- तात. कोष्टयांची स्थिति मात्र फार वाईट आहे, तरी ती इतर प्रांतांतील को- ष्टचांचे स्थितीइतकी वाईट नाही. तलम कापड, बायकांची लुगडी वगैरे माल ते तयार करतात व त्याचा खपही चांगला आहे. एकंदरीत पर्जन्य चांगला पडतो असे भागांतील रयतेची स्थिति चांगली आहे. तो बरोबर पडत नाही असे भागांत पीक गेलें तरी रयतेची स्थिति वाईट होत नाही. अशी आपत्तीची सालें लागोपाठ दोन तीन आली तर त्या- पासून सुधारणेस मोठा व्यत्यय येतो. लोकमत-येथपर्यंत या भागांत हिंदुस्थानांतलि लोकस्थिती संबंधाने दश- वार्षिक रिपोटांत जे आभप्राय प्रदर्शित केले आहेत त्यांचा सारांश दिला. आतां त्याच विषयावर लोकमत काय आहे ते अगदी थोडक्यांत देतो. इंग्रजांचा अंमल या देशांत सुरू होण्याचे पूर्वी समाजाची घटना हल्लीप्रमाणे एकदेशी नव्हती; तेव्हां सर्व धंदे सारखे चांगले चालत असलेमुळे ती फार व्यवस्थेशीर होती. शेतकी जरी उदरनिर्वाहाचे मुख्य साधन होती तरी इतर धंदेही चांगले चालत असत व या देशास जरूर ते पदार्थ सर्व येथले येथेच पैदा होत असत; व तसेंच भांडवल व नफा देशांतले देशांतच खेळती असत. हल्ली ही सर्व स्थिति पालटली आहे. देश तील सर्व उद्योगधंदे बसले आहेत, व त्यामुळे कारागीर व धंदेवाले लोक पंगू व निर्धन झाले आहेत व त्यांची इतर कोणतेही राष्ट्रास ठाऊक नाही अशी विलक्षण व सार्वजिक निकृष्ट स्थिति झाली आहे. या निकृष्टावस्थेची कारणे अशी देतां येतील :- (१) देशांत सर्वत्र दारिद्य वाढत चालले आहे. (२) कनिष्ठ प्रतीचे लोक विपद्भस्त झाले आहेत. (३) साधारण प्रतांचे लोकांत धनसंचय होत नाही व सांस द्र- व्याचे अभावामुळे प्रसंग पडला असतां टिकाव धरण्याचे सामर्थ्य नाहीसे झाले आहे. या विषयाचा विचार करतांना प्रथमतः लोकांचे प्राप्तीबद्दल विचार केला पाहिजे. या देशांत प्राप्ती किती होते याबद्दल मि. दादाभाई नवरोजी यांनी हिशेब करून ती दरसाल रु. २० पडते असे काढले आहे. सन १८८२ साली सरकारांनी केलेले चौकशीत सालास दरमाणशी प्राप्ती रु० २७ पडते असे निष्पन्न झाले व त्यावरून हिंदुस्थानचे फडणीस यांनी कर देणारे लोक फारच गरिबीत आहेत असे कायदे कौन्सिलांत बोलून दाखविले. हे प्राप्तीचें मान इतर सुधारलेले देशांचे प्रमाणाने फारच कमी आहे. या देशांतील लोकांपेक्षां विलाय-