पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/४२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

.. सून ८० (४०५) शेतकी व सारा या प्रांतांत सुमारे भागांत कायमचे साऱ्याची पद्धति चालू आहे ; त्या भागांतील लागवडी जमिनीसंबंधाने माहिती मिळत नाही. ह्या जमीनदार व इनामदार लोकांची स्थिति इतर प्रांतांतील त्यांचे बंधुवर्गाहून भिन्न नाही. सन १८९१-९२ चे पूर्वीचे चाळीस वर्षांत शेतकीची स्थिति किती सुधारली, हे पाहता असे दिसते की, जिराईत शेती तिसरे हिंशाने वाढली आहे, सरकारी पाटबंधा-यापासून होणारी शेती दीडपट वाढली आहे ; व विहिरीपासून होणारे बागाईत २ पट वाढले आहे. बागाईत वाढल्याने दोन पिके घेण्याची वहिवाट गेले दहा सालांत पुष्कळ वाढली आहे. १० वर्षांचे पूर्वीचे प्रमाणाने आतां दुप्पट जमिनीत दोन पिके होतात. खाण्याची धान्ये ७९ पा- टक्के पर्यंत जमिनीत होतात ; सन १८८१ चे मानाने ही पिके होणारे जमिनीची वाढ एकपंचमांशावर झाली आहे. गाळताचे धान्याचे लागवडीची जमीन दुप्पट वाढली आहे, व कापसाची लागवड सुमारे 3 जास्त वाढली आहे. शेतकीची जनावरें व नांगर-गाड्या वगैरेंची चांगली वाढ झाली आहे. या प्रां- तांत लागवडीलायक जमीन पुष्कळ शिलक आहे व ती लागवडीस असलेले ज- मिनीपेक्षां हलकी नाही. जिराईत जमिनीपासून सान्याचे चौपट भाडे येते व कांही जमिनीचे भाडे तर दसपटही येते. जमिनीच्या किंमती पूर्वीपेक्षा जास्त येतात. विहिरीही वाढत आहेत. रस्ते.-सन १८५२ साली सुमारे तीन हजार मैल रस्ता साफ केलेला असा- होता, आता त्याची लांबी २५ हजार मैल आहे. याशिवाय १९०० मैल आग- गाडीचा रस्ता आहे व १५०० मैल कालव्यांतून जातां येतां येते. रस्ते वाढल्या- मुळे व्यापारांतही चांगली वाढ झाली आहे. धान्याच्या किंमती--जिकडे तिकडे रस्ते झाल्याने सर्व प्रांतांत किमती साधारणपणे सारख्या राहतात. गेले चाळीस वर्षांत धान्याच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. मजुरी.. ..- मजूरदार लोकांस मजुरीबद्दल बहुतकरून धान्यच मिळतें, व कनिष्ट जातीचे लोकांपेक्षां वरचे जातीचे लोकांस मजुरी जास्त मिळते. याचे कारण वरचे जातीचे लोकांस शेतक-याचे घरांतही नौकरी करण्यास सांप- डते, तशी कनिष्ट जातीचे लोकांस सांपडत नाही. गोदावरी व कृष्णा यांवे दुबे- ळक्यांत दक्षिण व उत्तर हिंदुस्थानांतून मजूरदार येतात. गेले वीस वर्षांचे मानाने पाहतां मजूरदारांची स्थिति सुधारलेली दिसत नाही. शहरांत मजुरीचे