पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/४१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४४) असून सारा दर एकरास २... रुपये पडतो. या प्रांतांत कांहीं जमीन कर- णारे लोकांस लष्करी किंवा पोलिसची नौकरी करावी लागते, व असे लोकांकडे निम्मे साऱ्याने जमिनी चालतात. रस्ते व व्यापार-या प्रांतांत आगगाज्या नाहीत. गाडीरस्ते मात्र पुष्कळ झाले आहेत. लोकांची राहण्याची त हा ही सुधारली आहे. मीठ, दारू, व परकी कपडा यांचा खप वाढला आहे. कर्जबाजारीपणा-चैनीने राहण्याची संवय वाढल्यापासून कर्ज काढण्या- ची प्रवृत्ति, व दानचा प्रसार ही वाढत आहेत ; या कारणाने एखादे सालीं पीक चांगले आले नाही तर कर्ज काढल्याशिवाय तसे लोकांचा निर्वाह लागत नाही. पाऊसपाण्याची वगैरे स्थिति चांगली असल्याने जमीन करणारे लोक आळशी राहतात. जमिनीची वाटणी होऊं नये असा १८५८ साली कायदा झाला आहे; तरी आपसांत वाटण्या नेहमी होतात; व त्यापासून जमि- नीचे लहान लहान तुकडे होऊन जमीनदार लोकांची सुधारणा होण्यास अडचण होते. धंदे व मजुरी-दसरे प्रांतांतून काफीचे वागांत काम करण्यासाठी ह्या प्रांतांत ४५ हजारपासून ६० हजारपर्यंत मजूरदार येतात; या लोकांस मजुरी ही चांगली मिळते. कुर्गचे कायमचे राहणारे मजूरदार भातशेतांतच गुंतले जातात. कारागीर लोकांची संख्या मोठी नाही, त्यापैकी कोष्टी लोकांची स्थिति वाईट झाली आहे ; हवा चांगली, जमीन चांगली, लोक वस्ती पातळ, असें आहे तरी, शेतकरी वर्गाची स्थिति चांगली नाही. काफीचे पीक करण्याकडे या लोकांचे जास्त लक्ष लागले आहे हे एक तशी स्थिति होण्यास कारण आहे ; ते असे की, काफीचें पिकापासून जरी चांगला नफा होतो तरी ते पीक चांगलें येणे फार अनिश्चित असते. जमिनीची वाटणी फार होते व लोक चैनी व निरुद्योगी आहेत ही त्यांच्या वाईट स्थितीची कारणे आहेत. मद्रास इलाखा-मद्रास इलाख्यांतील काही भागांत पर्जन्य नेहमी कमी पडतो; काही भागांत, पर्जन्याची कधीच तूट पडत नाही ; पूर्वेकडील भागांत पर्जन्य बहुतकरून चांगला असतो, तरी कधी कधी त्या भागांतही त्याची तूट पडते. सन १८९१ सालचे मोजणीवरून असे दिसते की सन १८७६-७७ चा दुष्काळ ज्या भागांत पडला होता त्या भागांत लोकवस्तीची वाढ शेकडा वीस टक्के झाली आहे व या भागांतील रयत दुष्काळांत जी परागंदा झाली होती ती सर्व परत आली आहे. इतर भागांत लोकवस्तीची वाढ शेखडा ११३ टक्के झाली आहे. .. 3