पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/४१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४०३) तो मुळीच पडत नाही असेंही होते. तसे झाले झणजे पीक व चारा होत नाहीत इतकेच नाही, तर पिण्याचे पाण्याचेही दुभिक्ष होते. सन १८९१-९२ सालचे पूर्वीचे १० वर्षांत पहिली सहा वर्ष चांगली गेली व त्या सालांत पुष्कळ धान्य परदेशांस जात असे. त्याचे पुढील ४ सालांत या प्रांतांत परदेशांतून धान्य आणावे लागले. या दहा सालांत अजमीरची वस्ती १७३ टक्के व मेरवाड्यांतील वस्ती १०० टक्के वाढली आहे. अजमीर प्रांतांत दर एकरास सारा रु. १-८-९ व मेरवाज्यांत रु. २-२ पडतो. पर्जन्याच कमताईमुळे, व लग्नकार्ये व उत्तर- विधि यांचे संबंधानें खर्च फार करण्याची वहिवाट असल्यामुळे शेतकरी लोक कर्जबाजारी आहेत. या प्रांतांत मोठाल्या इष्टेटी एकेका मालकाच्या असून, ते त्या कुळांस देतात व त्या कुळांवर धारा फारच जबर असतो. जमीनदोर लोकांच्या इष्टेटीही सावकाराकडे जाण्यास सुरुवात झालेली आहे; या प्रांतांत आगगाड्या पुष्कळ असल्यामुळे धान्याच्या किमती फारशा चढत नाहीत. मेर- वाडा प्रांतांतील रयत अजमिरांतील रयतेपेक्षा थोडी बरी आहे, तरी त्या लो- कांसही कर्ज काढण्याचे प्रसंग फार येतात. कुर्गप्रांत--या प्रांतांत पर्जन्य पुष्कळ व नियमाने पडतो; उत्तर भागांत सुमारे १३६ इंच व दक्षिण भागांत सुमारे इंच पडतो. हा प्रांत अगदी डोंगरी असल्यामुळे सगळीकडे एकसारखी शेतकी होत नाही. ठिकठिकाणी जमीन असेल तेथे भाताचें व काफीचे पीक होतें. वेलदोड्याचे पीक जंगलाचे प्रदेशांत होते. या प्रांतांत शहरें फार थोडी आहेत व तीही अगदी लहान आ- हेत. लोकवस्तीची वाढ फार कमी दिसते, कारण काफीचे लागवडीचे कामासाठी आलेले लोक सर्व सालभर या प्रांतांतच न राहता काम सरतांच परत जातात. सन १८९१ सालचे मनुष्यगणतीचे वेळी हे सर्व मजुरदार लोक परत आपले देशास गेले होते. यामुळे लोकसंख्या कमी भरली. या प्रांतांतील कायमची लो- कवस्ती १६ पासून २२ टक्केपर्यंत वाढली आहे असे दिसते. पिके--या प्रांतांतील मुख्य पिके तांदूळ, काफी, व वेलदोडे ही आहेत. सन १८८२ पासून १८९२ चे दरम्यान खाण्याची धान्ये लावण्याचे जमिनीत कांहीं वाढ झालेली नाही ; इतर पिकांचे जमिनींत २९ टक्के वाढ झाली आहे. तांदु- ळाचे पीक होतें तें कायमचे रहिवाशी लोकांस पुरेसे होतें. परदेशांहून आलेले लोकांसाठी बाहेरून पुष्कळ धान्य आणावे लागते. काफीचे पीक करण्यास युरो- पियन लोकांनी सुरुवात केली, परंतु आता तिची लागवड सर्व लोक करतात. हे पीक हवापाणी, रोग, वगैरे अनेक कारणांनी कमीजास्त होते. जमीनधारण करण्याची पद्धति-या प्रांतांत रयतवारीची पद्धत चालू ७०