पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/४१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

.. ( ४०२) नेमलें होतें ; या कमिशनाने, या कायद्यापासून रयतेचा फायदा झाला आहे, व इतर प्रांतांतही जरूर असेल तेथें तो लागू करावा असा आभिप्राय दिला आहे; व सारा वसूल करण्याचे पद्धतीत कांहीं सवलती असाव्या असेंही सुचविले आहे. याशिवाय आणखी काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत. या कमिशनाचे सूचनांस अनुसरून शेतकीचे कायद्यांत नुकतीच दुरुस्ती करण्यांत आली आहे, व साऱ्याचे पद्धतीविषयी केलेल्या सूचनांसंबंधाने सरकारांत विचार चालू आहे. इतर प्रांतांत लोक कर्जबाजारी होण्यास उधळपट्टी, अव्यवस्थितपणा, निरु- योग, निरुत्साह वगैरे जी कारणे आहेत ती या प्रांतांतील रयत लोकांसही लागू आहेत, परंतु त्यांशिवाय या प्रांतात पर्जन्य नेमाने पडत नाही हेही एक विशेष कारण आहे. या प्रांतांत कृत्रिम उपायाने पाणी आणण्यास सवडी थोड्या आहेत. सन १८७६-७७ चे दुष्काळापासून अलीकडे पीक बरं यतें. दौंड-मनमाड व सदर्न मराठा या आगगाड्यांचे वे दुसरे रस्ते वाढले आहेत त्यामुळे व्यापार वाढला आहे, व मजुरी मिळण्यास जास्त सोई झाल्या आहेत. तळी व पाटबंधारे यांपासून जास्त जमिनीस पाणी मिळू लागले आहे, यामुळे शेतकरी लोकांची स्थिति पूर्वीपेक्षां कांहीं सुधारली आहे ; व या सुधारणेपासून होणारा फायदा रयतेच्या पदरी पडण्यास शेतकीचे कायद्याने मदत झाली आहे. तरी पीक कमी आले तर लहान लहान जमिनी करणारे लोक व शेतकीची मजुरी करणारे लोक यांची धांदल उडतेच. धंदेवाले व कारागीर-इतर प्रांतांचे मानाने या प्रांतांत कारागीर लोक जास्त आहेत. कापूस पुष्कळ पिकत असल्याने या प्रांतांत विणकरीचा धंदा जास्त चालतो. विलायतेहून कापड येऊ लागल्याने या लोकांचे धंद्यास कमीपणा आला आहे, तरी गिरणीचे सूत घेऊन कापड विणल्याने या लोकांस, इतर प्रांतांप्रमाणेच, गुजाऱ्यास काही साधन होत असेल. दुष्काळ पडला ह्मणजे अंमल याच लोकांवर प्रथमतः होतो. मोठाली शहरें व कारखाने असलेली गांवें शिवाय करून बाकीचे भागांत मजुरी बहुतेक ऐनजिनशींच देण्यांत येते. यामुळे व धान्याचे किमतीचे चढामुळे या लोकांचे स्थितीत बदल होत नाही. दुष्काळाचे दिवसांत मात्र यांची स्थिति वाईट होते. इतर वेळी जरी त्यांस गरिवीने रहावे लागते तरी, त्यांची स्थिति संकटाची नसते. एकंदरीत रत्नागिरी जिल्ह्याशिवाय बाकीचे भागांची पर्जन्य चांगला हणजे स्थिति चांगली असते. रत्नागिरी जिल्ह्यांत मात्र जमिनीपासून लोकांस पुरेसें धान्य उत्पन्न होत नाही. अजमीर मेरवाड--या प्रांतांत पर्जन्य नेहमी कमी पडतो व फार वेळां पडत असला