पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/४१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४००) मुंबई इलाखा-या इलाख्याचे सिंध, कोंकण, गुजराथ, व दक्षिण प्रांत, असे चार मुख्य भाग आहेत. सिंध प्रांत-सिंध प्रांताची स्थिति पंजाब प्रांतांतील स्थितीसारखी आहे. लोकांची स्थिति चांगली आहे. शेतकी सिंधु नदीचे पुरावर चालते, तेव्हां पूर ज्या मानाने पसरेल ला मानाने शेतकी की किंवा जास्त वाढते. सन १८८१- ८२ साली २१२१ हजार एकर जमीन लागवडीस होती, त्या पैकी १६०२ हजार बागाइत होती. सन १८९१-९२ साली २९४५ हजार एकर जमीन लागवडीस होती, त्यापैकी २६०१ हजार एकर वागाइत होती. जमिनीवर सारा दर एकरास रु. १-४-८ पडतो व पाण्याचा आकार मिळावला तो दर एकरास रु.३-८-५ पडतो. हा सारा वसूल होण्यास अडचण पडत नाही. सन १८९१-९२ साली २३५ हजार एकर जमिनीत दोन पिके करण्यांत आली होती. सन १८८१-८२ चे मानाने ही पिकें आतां दुप्पट जमिनीत होतात. बहुतेक जमिनीत खाण्याचे धान्य पिकतें. या प्रांतांतील शेतकऱ्यांची स्थिति चांगली आहे. मुंबई इलाख्याचे इतर भाग-या इलाख्यांत सन १८७७ साली दुष्का- ळ पडला होता. दुष्काळ पडलेले सात जिल्ह्यांत लोकवस्ती सुमारे १९६ टक्के वाढली आहे, व इतर भागांत ती सुमारे १०३ टक्के वाढली आहे ; ही वाढ जशी खेडेगावांत झाली आहे तशी शहरांतून झाली नाही. या प्रांतांत धंदे रोजगार करणान्यांचे प्रमाण थोडे जास्त आहे. शेतकी-गेले १० सालांस सुमारे सवा दहा लक्ष एकर जमीन नवीन ला- गवडीस आली, व दुपिकी जमिनीत ही सुमारे १ लक्ष एकराची वाढ आहे. वि- हिरीचे पाण्यान व तळयाचे पाण्याने वागाइत वाढत आहे. सन १८८१-८२ चे मानाने सन १८९१-९२ साली दुप्पट जमिनींत बागाइत होते. लागवडीस येण्यासारखी पड जमीन पंचमहाल, खानदेश, सोलापूर व विजापूर जिल्ह्यांत मिळून सुमारे १०१ लक्ष एकर शिलक आहे ; परंतु ती हल्ली लागवडीवर अस- लेले जमिनीसारखी चांगले मगदुराची नाही. शेकडा सुमारे ७९ एकर जमिनीत खाण्याची धान्ये पिकतात. कोंकण व गुजराथ यापेक्षा दक्षिणेत व कर्नाटकांत, पर्जन्याचे मान अनिश्चित असल्यामुळे, सारा थोडा हलका आहे. एकंदर सारा सुलभ रीतीनें वसूल होतो. रस्ते व धान्याचे दर-या प्रांतांत गेले १० सालांत आगगाडीचा रस्ता दीडपट वाढला आहे, व सर्व प्रांतांत रस्त्याची सोय चांगली झाली आहे. धान्याचे दर गेले १० सालांत शेकडा १० पासून २५ टक्केपर्यंत व कर्नाटकांत