पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/४१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वकील व साव- गेले १० खाण्या- आगगाडी व कारखाने यांतही काम मिळते. कुंभार व मोची व तेली यांची स्थिति वाईट आहे. कोष्टयांची स्थिति तर पूर्वीपासूनच वाईट आहे व त्यांचा बारीक कापड विणणाऱ्यांचा रोजगार अगदीच बसला आहे. कार यांचेच धंदे काय ते बरे चालतात. वन्हाड--या प्रांतांत ब्रिटिश सरकारचा अंमल प्रथमतः सुरू झाल्यावर कांही दिवस इतर प्रांतांतून पष्कळ लोक या प्रांतांत राहण्यास आले, व दक्षिणे कडील दुष्काळाचे वेळी या प्रांतांत बाहेरून पुष्कळ लोक आले. सालांत दुसऱ्या प्रांतांतून लोक येथे येऊन राहण्याचे कमी झाल्यासारखें दिसते. शेतकी व सारा -सन १८८१-८२चे मानाने पाहतां लागवडी जमि- नीची वाढ फारच थोडी झाली आहे. इतर प्रांतांचे मानाने पाहतां या प्रांतांत खाण्याचे धान्याशवाय इतर पिकें जवळ जवळ निम्मे जमिनीत आहेत, व सन १८८१-८२ चे मानाने पाहतां या प्रमाणांत अंतर झाले नाही. शिवाय जिनसांचे पिकांत कापूस व गळिताची धान्ये हीच मुख्य आहेत. पर- देशांस रवाना होणारे धान्यांत कापूस व गहूं ही मुख्य आहेत. मुंबईहून, नागपुरास जाणारा रस्ता या प्रांतातून जातो, व त्यास मिळणारे पाय रस्ते पुष्कळ झाले असल्यामुळे शेतकाऱ्यांसे माल विकण्यास सोय झाली आहे. रयातवारी पद्धतीने जमिनी लागवडीस दिलेल्या आहेत. सन १८८१-८२ चे मानाने सुमारे पांच टक्के जमीन नवीन लागवडीस घेण्यांत आली आहे. शेताचा सारा सरासरीने दर एकरास १४ आणे पडतो. तो वसूल होण्यास सरकारास विलकूल अडचण पडत नाही. कर्जबाजारीपणाः-इतर प्रांतांप्रमाणे या प्रांतांत ही शेतकरी कर्जबा- जारी आहेत. सावकार लोक हे गुजराथी व मारवाडी वर्गाचे विशेष आहेत. ते लोक जमिनी करीत नाहीत किंवा घेतही नाहीत, तर कुळांकडूनच निघतील तितके पैसे काढतात. मजुरी व धान्याच्या किमती -या प्रातांत मजुरदारास मजुरी रोकड मिळते हे इतर प्रांतांचे मानाने विशेष जाहे. सुधारणेत मागसलेले भागत मात्र मजुरी ऐनजिनशी देतात. धान्याच्या किमती या प्रांतांत फार वाढल्या आहेत. ज्वारी व बाजरी यांची किंमत जवल जवळ दुप्पट, डाळ दाणा व गहूं यांची किंमत दीडपट वाढली आहे. गव्हाची किंमत परदेशांत मागणी असेले त्या मानाने असते. एकंदर लोकांची स्थिति चांगली आहे.