पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/४१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३९८) करणारे लोक यांमध्ये कर्जबाजारीपणा पुष्कळ झाला आहे. जमिनीवरील मालकी ज्या प्रमाणाने जास्त चांगली असेल, त्या मानाने जमिनदार लोक कर्ज काढण्यास जास्त प्रवृत्त होतात ; हा जो इतर प्रांतांतील अनुभव, तो या प्रांता- सही लागू पडतो. सुमारे १ जमीन शेती न करणारे लोकांचे हाती गेली आहे असें अलीकडील सेटलमेंट चौकशीचे वेळेस दिसून आले आहे. जेथें कुळास हक्क जास्त व जमिनीचे मालकाचे हक्क कमी असतात त्या भागांत, कर्जबाजा- रीपणाही त्या मानानेच कमी असतो. कुळांतही असाच प्रकार दिसून येतो. ज्या मानाने त्यांचा जमिनीवरील हक्क दृढ असेल त्या मानाने त्यांचीही कर्ज काढण्याकडे जास्त प्रवृत्ति असते. या प्रांतांतील उत्तरेकडील जिल्ह्यांत व नर्मदेचे खोऱ्यांतील प्रदेशांत जमिनदार व रयत हे जास्त कर्जबाजारी आहेत. या भागांत व नागपूर व वर्धा जिल्ह्यांत पुष्कळ जमीनी कुळांकडून सावकारांकडे गेल्या आहेत. शेतकीची मजुरी-पूर्वेकडील भागांतील कुळांची व शेतकीसंबंधी मजुरी करणारे लोकांची स्थिति चांगली आहे. मजुरी काही ऐनजिनशीं व कांहीं नक्त अशी देण्यांत येते. नागपूरचे आसपासचे भागांत नक्त पगाराची वहिवाट प- डत चालली आहे व तिचा दर पूर्वोचेपेक्षां वाढला आहे. एकंदरीत रोज म- जुरी करणारे लोकांस काम कमी मिळते असे नाही. मजूरदार लोकही कर्ज- बाजारी आहेत. जंगली लोक-गोंड लोक व तशा प्रकारचे दुसऱ्या जातीचे लोक हे या प्रांतांतील मूळचे रहिवाशी होत; त्यांस सुपीक सपाट प्रांतांतून हांकून दिल्यामुळे ते जंगलांत जाऊन राहिले. ही गोष्ट १५० वर्षांचे आंतील आहे. हे लोक शेत- कीवर उपजीविका करणारे आहेत व गेले मनुष्यगणतविरून या लोकांची संख्या कमी झाली असें दिसत नाही. हे लोक लग्नकार्यासाठी व मद्यपानासाठी पुष्कळ कर्ज काढतात ; व सर्व सावकारांत दारू विकणारा सावकार त्या लोकांस मोठा कठीण जातो. तरी कर्जबाजारीपणामुळे यांचे सुधारणेस व्यत्यय आला असे दि- सत नाही. हे लोक राहतात त्या भागांत जास्त जमीन लागवडीस आलेली आहे व कांही भागांतील शेतकीची पद्धतही सुधारलेली आहे. अगदी डोंगरांत राहणारे लोक अजून रानटी स्थितीत आहेत. त्यांस चांगली शेतकी करतां येत नाही, व ते आपला उदरनिर्वाह रानांतील फळे, पारध, व घुशी उंदीर यांज- धंदेवाले व कारागीर लोक--शेतकीवरच केवळ अवलंबून नाहीत अशा धंदेवाले लोकांपैकी सुतार व लोहार यांस साधारण मजुरी मिळते व त्यांस चर करतात.