पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/४१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

धान्या (३९७ ) लागवड झाली तर हल्लींपेक्षां पुष्कळ जास्त पीक येईल असा पूर्ण संभव आहे, असें शेतकीसंबंधी पूर्ण माहितगार लोकांचे मत आहे. जमिनीत दोन पिके घे- ण्याची वहिवाट अलीकडे बरीच वाढत आहे. धान्यसंग्रह व धान्याच्या किंमती--या प्रांतांत उत्पन्न होणारे धान्यांतून प्रांतांतील लोकांस लागणारे धान्य व परदेशी जाणारे धान्य वजा केले तरी पुष्कळ धान्य शिलक राहते. गेले ३५ वर्षांचे मानाने पहातां धान्या- च्या किमती ही पुष्कळच वाढल्या आहेत. तांदुळाची किंमत तिप्पट, गव्हांची जवळ जवळ पावणेतीनपट, ज्वारीची सवादानपट, व डाळ दाण्याची किंमत दुप्पट, अशा किमती वाढल्या आहेत. शेतकीस पूर्वीपेक्षा खर्च जास्त लागतो, तरी मालाचे किमतीचे वाढीचें मानाने खर्चाची वाढ झालेली नाही. शिवाय इतर माल ह्मणजे कपडालत्ता, भांडी व मीठ यांची किंमत पुष्कळ .उतरली आहे. रस्ते-रस्ते ह्मणण्यासारखे वाटले नाहीत. उत्तरेस इंडियन मिडलंड व पूर्वेस बंगाल नागपूर हे रस्ते झाल्याने आगगाडीचा प्रसार वराच झाला आहे. १० वर्षांपूर्वी ५७७ मैल आगगाडी होती तेथें आतां (१८९१-९२ साली) ११३३ मैल झाली आहे. व्यापार--व्यापार संबंधाने सुमारे २५ वर्षांचे पूर्वीची व हल्लींची स्थिति पाहतां, आयात व्यापार जवळ जवळ दुपटीवर व निर्गत व्यापार तिपटीवर गेला आहे. सन १८७८ सालापासून आंत येणारे मालापेक्षा अधिक माल बाहेर जाऊ लागला. जमिनीचे मालक व कुळे -या प्रांतांत जमीन धारण करण्याच्या पद्धति कशा आहेत हे पूर्वी सांगितले आहे. जमिनीचे मालक व त्यांची कुळे यांचा परस्पर संबंध पाहिला तर, सुमारे निम्मे कुळांसंबंधी सारा वाढविण्याचा किंवा त्यास काढून टाकण्याचा जमिनीचे मालकास कांहीं अधिकार नाही. शेकडा सुमारे २८ टक्के कुळांवर व त्यांचे स्वतःचे मालकीचे व वहिवाटीचे जमि- नीसंबंधाने मात्र मालकांचा पूर्ण अधिकार चालतो. एकंदर प्रांताची स्थिति जशी सुधारली आहे, त्या मानानें कुळांकडून घेण्याचा साराही वाढला आहे. या प्रांतांचे काही भागांत मात्र जमिनचेि मालक कुळांकडून जास्त सारा घेतात व ही स्थिति जेथें जमिनचेि मालक जमिनीची लागवड स्वतः करीत नाहीत किंवा जेथे जमिनीची चणचण झाली आहे असे ठिकाणी दिसते. ही स्थिति सरकारचे लक्षात आली आहे. कर्जबाजारीपणा [-या प्रांतांतील जमिनदार किंवा जमिनीची लागवड