पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/४११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३९६ ) व मासे हे आहेत. तांदुळांची किंमत व मिठाची किंमत वाढत आहे. पूर्वी ब्रह्मी लोक आपल्यास लागणारा धान्याचा सांठा ठेवून बाकीचे विकीत असते ; परंतु अलीकडे सर्व पीक पहिल्याने विकून टाकूने पुढे लागेल तसा माल बाजारांत विकत घेण्याची चाल पडत आहे. माशांचे किमतीत कांहीं अंतर पडले नाही. ब्रह्मदेशाचा व्यापार वाढला आहे, त्याबद्दल व्यापाराचे भागांत सांगण्यांत आलेच आहे. कर्जबाजारीपणा.-या प्रांतांतही शेतकरी कर्जबाजारी आहेत, तरी इतर प्रांतांतील शेतकऱ्यांप्रमाणे ते कंगाल झालेले नाहीत. ब्रह्मी लोक चैनी आहेत. इतर देशांतून या देशांत लोक येऊन राहू लागले आहेत व तेथील वस्ती वाढत आहे. धंदेवाले व कारागीर-या प्रांतांत कारागीर लोकांची संख्या वाढलेली नाही. सुतार व सोनार यांचा धंदा चांगला चालतो. मजुरदारांस सरकारी व व्यापाऱ्यांचे कामावर मजुरी चांगली मिळते व गेले १० सालांत मजुरीचे दर पुष्कळ वाढले आहेत. मध्यप्रांत-हा प्रांत बंगाल, वायव्यप्रांत व महाराष्ट्र देश यांचे मध्ये आहे व ह्या प्रांतांचे सानद्ध असलेले भागांची स्थिति शेजारचे प्रांताप्रमाणे आहे. या प्रांतांतील जमिनीचे तीन वर्ग आहेत. (१) भात पिकाची जमीन (२) काळी जमीन (३) डोंगरी जमीन. भात पिकाची जमीन पूर्व बाजूस आहे. काळी जमीन उत्तर व पश्चिम बाजूस आहे, डोंगरपट्टी मध्यभागांत आहे. या प्रांतांत मोठाली शहरे काय ती दोनच आहेत, यामुळे खेडेगांगांत राहणारे लो- कांचे प्रमाण इतर प्रांतापेक्षा फार मोठे आहे. साधारण क्षेत्राचे मानाने लोक- वस्ती काहीशी कमी दिसते,-तरी जंगली प्रदेश वजा केले तर लागवडीस असलेले जामिनाचे दर मैलास लोकवस्ती सुमारे ३९५ बसते. आतां दुसरें प्रांतांतून लोक येऊन या प्रांतांत राहाण्यास बहुतेक सोय नाहींसारखी झाली शेतकी.-सन १८६७-६८ चे मानाने पाहता लागवडी जमिनीची वाढ एकंदरीत २८ टक्के झाली आहे. भातशेतीची जमीन पूर्वीपेक्षां १८ टक्के वाढ- ली आहे. गव्हांची लागण २४ टक्के व दुसऱ्या धान्याची १४ टक्के वाढली आहे. गाळताचे धान्याची पूर्वीपेक्षा आता दुप्पट लागवड होते. अजून लागवडीस न आलेली जमीन बरीच आहे ; ती लागवडीस असलेले जमिनीपेक्षा कमी कसाची आहे. हल्ली लागवडीस असलेले जमिनीपासून उत्पन्न बरोबर रीतीने होत नाही, व या कामांत हल्लीपेक्षा थोडे जास्त लक्ष घालून शेतांची आहे. ..