पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/४१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३९५) धंदेवाले व इतर शेतकी न करणारे लोक-या प्रांतांत धंदेवाले लोक व कारागीर लोक यांस पुरेसें काम मिळत नाही. दुसरे भागांतून मजुरीसाठी मजु- रदार लोक पुष्कळ येतात व त्यांचा मजुरीचा दरही वाढला आहे. एकंदरीत या प्रांतांत शेतकरी लोकांची स्थिति चांगली आहे असे दिसते. ब्रह्मदेश--या प्रांताचे खालचा ब्रह्मदेश व वरचा ब्रह्मदेश असे दोन भाग आहेत. या दोन्ही भागांचे हवा पाण्यांत फरक आहे. खालचा ब्रह्मदेश चांग- ला सुपीक असून त्यांत पाऊस नेहमी चांगला पडतो; वरचे ब्रह्मदेशांत पर्ज- न्याची वारंवार तूट पडते. दोन्ही भागांत तांदूळ हेच मुख्य पीक आहे; त्या शिवाय वरचे ब्रह्मदेशांत गहूं, जोंधळे, मका, व डाळदाणा वगैरे पिके होतात. खालचे ब्रह्मदेशांत तांदुळाशिवाय ऊस, तंबाखू व भाजीपाला होतो. या प्रांतांत शहर गांवांत राहणारे लोकांचे प्रमाण मोठे आहे, व बंगाल्यांतून व मद्रासेंतून या प्रांतांत पुष्कळ लोक येतात. शेतकी-खालचे ब्रह्मदेशांत गेले १० सालांत शेतकी तुमारें दिढीने वाढ- ली आहे. सन १८९१-९२ साली जमिनीत तांदूळ पिकत होते. लागव- डीस असलेले व पड जमिनविद्दल शेतकांचे भागांत सांगितलेच आहे. धान्यसंग्रह-या दोन्ही प्रांतांत तेथील खपास पुरून पर देशास पाठवि- ण्यास पुष्कळ धान्य पिकते. खालचे ब्रह्मदेशांतून वरचे ब्रह्मदेशास व इतर देशांस पुष्कळ तांदूळ जातो. वरचे ब्रह्म देशाची स्थिति सुधारेल त्या मानाने त्यास धान्यसंग्रहासाठी खालचे ब्रह्मदेशावर अवलंबून रहावे लागणार नाही. ब्रह्मी लोकांची द्रव्यसंचय करण्याकडे प्रवृत्ति फार कमी आहे; उदरनिर्वाह होऊन पैसा उरेल तो चैनीत किंवा पुण्यसंचय करण्यांत खर्च करतात. या प्रांतांत आगगाडी. चा व नुस्ता रस्ता पुष्कळ झाला आहे व इरावती नदीतून आगबोटीही चालतात. जमिनीवरील सारा-खालचे ब्रह्मदेशांत जमीन बाबीशिवाय स्थानिक सु- धारणेसाठी जमीन बाबीचे आकारावर शेकडा १० टक्के कर आहे. व शिवाय मनुष्यावरही कर घेण्यात येतो. वरचे ब्रह्मदेशांत जमीन बाव व मनुष्यावर कर यांचेबद्दल घरपट्टीच घेण्यांत येते. हा कर अनेक कारणांनी सर्वांवर सारखा ब- सवितां येत नसल्यामुळे, जमीन बाब सुरू करण्यासाठी सर्व्ह करण्यांत येत आहे. या प्रांतांत जमीन धारण करणारेच बहुतकरून जमीन करतात. खालच ब्रह्मदेशांत शहरांचे जवळ, सावकार किंवा मध्यस्थ यांचे हाती जमीन जाउन, त्यांचे पूर्वीचे मालकांनी कुळाप्रमाणे तिची लागण करण्याची पद्धति सुरू केली आहे. जमीन सुपीक असल्यामुळे सारा देण्याची अडचण पडत नाही. धान्याच्या किमती-ब्रह्मी लोकांस लागणारे जिनसांपैकी मुख्य तांदूळ, मीठ ८