पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/४०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

या भागांतील लोकवस्तीपैकी एक पंचमांश लोकांस अपुरे अन्नावर दिवस काढावे लागतात असा अजमास आहे. मजुरदार व धंदेवाले लोक.-आगगाड्या, गोया, व दुसरी सार्वजनिक कामें, तशीच कोळशाच्या खाणी, लोखंडाच्या खाणी, जूटचे कारखाने यांवर पुष्कळ मजूर लाकांचा निर्वाह चालतो. कोष्टी लोकांची स्थिति वाईट आहे व ते शेतकी करूं लागले आहेत. कुंभारांची बहुतेक तशीच स्थिति झाली आहे. सुतार, लोहार, सोनार यांची स्थिति चांगली सुधारली आहे. धान्याचे दर वाढल्याने पगारदार लोकांस त्रास होतो. वकील डाक्तर वगैरेंची स्थिति चांगली आहे. एकंदरीत बंगाल, ओरिसा व छोटा नागपूर या भागांतील लोकांची स्थिति पुष्कळ सुधारली आहे व जसजसे पूर्वेकडे जावें तसतशी जास्त सुधार- लेली स्थिति दृष्टीस पडते. बिहार प्रांतांत मध्यम वर्गाचे लोकांचीही स्थिति बरी आहे. आसाम-आसाम प्रांतांत डोंगरी प्रदेश व खोयांतील प्रदेश यांचा पृथक विचार केला पाहिजे. खोऱ्याचे भागांत जास्त उद्योगी लोकांची जरूर आहे. चहाचे लागवडीसाठी परठिकाणांहून लोक आणावे लागतात. शेतकी व सारा-ब्रह्मपुत्रा व सुर्म या खोन्यांत सन १८९१-९२ साली ६९ लक्ष एकर जमीन लागवडीस होती व सन १८८१-८२ साली ६४ लक्ष होती. या प्रांतांत १८८१ साली १५८ हजार एकर जमीन चहाचे लागवडीस होती, व ती वाढत जाऊन सन १८९१-९२ साली २४१ हजार एकर झाली. जमीन बा- वीचा बोजा सन १८८१-८२ साली दर एकरी रु० ०-८-१० होता व १८९१- ९२ साली रु. ०-९-११ झाला. सारा कायमचा ठरलला आहे असें भागांत कूळ- भरणा थोडा असल्यामुळे जमिनीचे भाडे थोडे येतेच व मालकाकडून बहुतेक लागवड होते. या प्रांतांत मालक व कुळे यांमध्ये सलोखा आहे. राहण्याची रीति-धान्याच्या किमती-लोकांचे राहण्याचे रीतीत सुधार- णा झाली आहे. भांडी दागदागिने व रेशमीवस्त्रे दृष्टसि पडतात. वरचे दर्जाचे कुळांचे दागिने सोन्याचे असतात. ब्रह्मपुत्रा व सुर्मा नद्यांतून येण्याजाण्याची सोय चांगली झाल्याने, व रस्ते वाढल्याने, व्यापार वाढला आहे. धान्याच्या किमती शेकडा ४० टक्के वाढल्या आहेत. कर्जबाजारीपणा-या प्रांतांत रयत कर्जबाजारी आहे. आसाम खोन्यांत मात सावकाराचे प्राबल्य अगदी कमी आहे; त्याचे उलट स्थिति सिल्हेट व सुर्म खोऱ्यांत आहे. या प्रांतांतील डोंगरी लोक बहुतेक शेतकीवरच निर्वाह करणारे आहेत.