पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/४०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

णाने पडत असल्यामुळे जमिनीचे भाडे जरव आहे तरी तें व सावकाराचे कर्ज ही देतां येतात. जूटचे व निळीचे पिकाची स्थिति अलीकले वाईट झाली आहे. गळिताची धान्ये जास्त करूं लागले आहेत. रयत लोक कर्ज काढतात ते लग्न- कार्यासाठीच काढतात, व एखादे साली पीक कमी आले तरी लांस अडचण न पडतां राहतां येते. पश्चिमेकडील भागांचें कलकत्याशी सांनिध्य असल्यामुळे भाजीपाला पुष्कळ होतो. जमिनी कुळांस व त्यांचेकडून पोटकुळांस अशा परंपरेनें लागत जात असल्यामुळे जमिनीचे भांडे एकंदरीत फार वाढते. भाडे जबर आहे व लग्नकार्याचा खर्च मोठा असतो तरी या भागांत सावकाराचे प्रावल्य ह्मणण्यासारखें नाहीं. ओरिसा प्रांतांत स्थानिक खपास हवा त्यापेक्षा तांदूळ पुष्कळ पिकतो; व तो सिलोन व मारिशस वेटांत पाठविण्यांत येतो. या प्रांतांतील हवा बंगाल्यांतले पेक्षा चांगली आहे व रयतेची राहण्याची घरे चांगली असतात. सावकारांचे प्राबल्य पुष्कळ आहे. चांगले स्थितीचे लोकांपैकी दोन तृतीयांश लोक कर्जबाजारी आहेत. लग्न कार्यात उधळेपणानें खर्च करतात. छोटा नागपूर प्रांतांतील रयत पूर्वीची रानटी असून आतां सुधारली आहे; त्यांच्या गरजा थोड्या आहेत व त्यांचे खाणेपिणे चांगले असते. सुधारलेले रितीभाती- चे अनुकरण झाले नाही, असे भागांत लग्नकायांत फारसा खर्च होत नाही. तसें अनुकरण करण्याचें ज्यांनी सुरू केले आहे त्या लोकांत कर्जबाजारीपणा शिरला आहे. या भागांत जमिनीचे मालक व कुळे यांचे दरम्यान स- लोखा नाही व त्यामुळे रयतेची स्थिति सुधारण्यास हरकत येते असें ह्मण- तात. रयतेचा कर्जबाजारीपणा वराच वाढला आहे. व त्याचे कारण लग्न- कार्यांत जास्त खर्च करणे हेच आहे. संथळ परगण्यांतील लोक चांगले मेहनती व व्यवस्थिपणानें खर्च करणारे असे आहेत. हे लोक पहिले डोंगरी जातीचे असून आतां चांगले सुधारले आहेत. डोंगरांत रहाणारे पहाडिया जातीचे लोकांची स्थिति चांगली नाही; ते जंगलांतच राहतात व पारधीवर व थोडी शेतकी करून निर्वाह करतात. बिहार प्रांतांत पूर्वेकडील भागांतील रयत प- श्चिमेकडील भागांतील रयतेपेक्षा जास्त चांगले स्थितीत आहे, पश्चिमेकडील भागांत जमीन वाईट आहे किंवा रयत उद्योगी नाही असें नाही. या भागांत रस्ते चांगले आहेत ; गहूं, मका, व अफू ही मौल्यवान पिके होतात. असे असूनही रयतेची स्थिति वाईट असण्यास कारणे पर्जन्याची कमताई, जमिनींचें अतिशय विभाग होणे, जमिनींचे भाडे जरब असणे ही आहेत. " बंगाल टे- नन्सी आक्ट " या कायद्याचा अंमल झाल्यापासून रयतेचे व जमिनींच्या माल- कांचे संबंध सुधारतील अशी आशा आहे. रयत लोक कर्जबाजारी आहेत. .