पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/४०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३९२) असें पडते. कायमचा सारा ठरलेले भागांत सन १८८१-८२ सालांत जमनि वापिासून सरकारास ३ कोटि ५२ लक्ष वसूल आला व १८९१-९२ सालों ३ कोटि ४९ लक्ष आला. जमीन बाबीशिवाय दुसऱ्या बा- बीचे उत्पन्न अलीकडे वाढले आहे. जमिनीवरील सारा व जमिनी- वरील इतर करांचे उत्पन्न सन १८८१-८२ साली ३ कोटी ७८ लक्ष झाले होते व सन १८९१-९२ साली ३ कोटी ८१ लक्ष झाले. कुळांकडून जमिनीचे मालक भाडे घेतात तें वेगळाले प्रदेशांत कमी जास्त असते, तरी साधारणपणे पूर्वेक- डील भागांतील जमिनीचे मालक दूर राहणारेच आहेत व तेथील रयत जमी- नदारांचा पगडा आपलेवर चालू न देण्यासारखी खवरदार आहे. बरद्वान भागांत साऱ्याचा दर जास्त आहे. बहार प्रांतांत कुळे व पोटकुळे यांच्यांत जमीन फार वांटली गेल्याने ती लागवडीस मिळण्यास अडचण पडते ; त्यामुळे भाडे फार वाढले असून एकंदरीत कुळांची स्थिति वाईट झाली आहे. ओरिसा व छोटा नागपूर प्रांतांत कांहीं जमिनसिंबंधी साऱ्याचा दर कायमचा ठरलेला आहे. या भागांत कुळांचा व जमिनीचे मालकांचा सलोखा नाही. रस्ते वगैरे-या प्रांतांत रस्ते वगैरे पुष्कळ वाढले आहेत. मोठाल्या नद्यांतून पूर्वीपेक्षा जास्त आगबोटी चालतात. आगगाडीचे रस्त्यांची लांबी गेले 10 सालांत दुप्पट झाली आहे. कालव्यांतून पुष्कळ माल नेण्याआणण्यांत येतो. या प्रमाणे दळणवळणाची सोय चांगली झाल्याने सर्व प्रांतांत धान्याची किंमत सारखी झाली आहे, व ती पहिल्यापेक्षा वाढली आहे. हा ह्या प्रांतासंबंधाने सर्वसामान्य विचार झाला ; आतां-त्याचे वेगळाले भागांबद्दल थोडा विचार करण्याचा आहे. वंगालचे पूर्व भागांत दुष्काळाची मुळीच भीति नसते. या भागांत लागवडीलायक जमीन अजून शिलक आहे. साऱ्याचा दर कमी आहे व जमीन करणारे लोक चांगले मेहेनती व हुषार आ- हेत. या भागांत मुख्यत्वेकरून तांदूळ पिकतो तरी जूटचे ( तागाचे) पिकानेही मदत होते. रयतेची स्थिति चांगली आहे व त्यांची राहण्याची तन्हा सुधारली आहे. लोक खर्चिक आहेत तरी, जमिनीचे पीक चांगले येत असल्यामुळे, त्यापासून काही अपाय होत नाही. बंगाल्यांतील उत्तर भागांतील रयतेची स्थिति पूर्व भागांतील रयतेच्या स्थिती इतकी चांग- ली नाही. या भागांत चहा, ऊस, तांदळ, जूट ( ताग ) भांग वगैरे पिकें होतात. जमिनीवरील सारा हलका आहे. या दोन भागांतील रयतेच्या स्थितीप्रमाणे या प्रांताचे मध्य भागांतील रयतेची स्थिती चांगली नाही. त्या भागांत लागवडी लायक जमीन फार थोडी राहिली आहे. पाउस नियमितप- रयतेस पुष्कळ