पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/४०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३९१) री वर्गाचा जसा फायदा झाला आहे तसा इतर वर्गाचा तोटा झाला आहे. नियमित प्राप्तीवर निर्वाह करणारे लोकांची स्थिति त्यामुळे वाईट झाली आहे. कारागीर लोकांची स्थिति एकंदरीत सुधारली आहे. सुतार, लोहार व गवंडी यांस आतां पूर्वीपेक्षां काम जास्त मिळतें. कोष्टी लोकांची स्थिति मध्यंतरी वाईट होती, परंतु अलीकडे कानपूर वगैरे ठिकाणचे गिरण्यांतील सूत त्यांस मिळू लागल्याने व त्यांनी विणलेले कैपड्यांचा खप होत असल्याने त्यांची स्थिति सुधारली आहे. सोनारांची स्थिति सुधारली आहे. मजुरदार लोकांस पब्लिक वर्क्सची कामें, कानपूर येथील कातड्याचे व कापसाचे कारखाने, आगगाडीचे द्वारें हो. णारा धान्याचा व्यापार यांत पुष्कळ काम मिळते. त्यांचे मजुरीचा दर सा- धारण दिढीने वाढला आहे व कारागीर लोकांचा दर याही पेक्षा जास्त वाढला आहे. धान्य महाग झाल्याने या लोकांचे स्थितीत जसें अंतर पडलें असतें तसे मजुरीचा दर वाढल्याने पडले नाही. बंगाल-या प्रांतांत पर्जन्य पुष्कळ नियमितपणे व सगळीकडे सारखा वाटून पडतो. बिहार प्रांताचे दक्षिण प्रदेशांत मात्र पर्जन्याची कमताई पडते. डों- गरी भाग व कलकत्ता शहर शिवाय करून बाकीचे भागांत जशी दाट लोक- वस्ती आहे तशी या देशांत इतर कोठेही नाही. डोंगरी भागांत वस्ती मैली १२२ आहे व शहरें शिवाय करून बाकीचे प्रांतांत अतिशय दाट वस्ती ह्मणजे सरण जिल्ह्यांत आहे. तेथे ती मैली ९३० आहे. सन १८९१ चे मनुष्यगण- तीचे पूर्वीचे दहा वर्षांत शहरांत वस्ती शेकडा ७ व बाहेरील प्रातांत ६ टक्के वाढली. शेतकी-शेतकरी व शेतकीवर मजुरी करणारे लोक शेकडा सुमारे ७० आहेत. किती जमिनीत लागवड झाली आहे व लागवडीस योग्य जमीन कि- ती शिलक आहे, तें शेतकीचे भागांत सांगितलेच आहे. या प्रांतांत बरीच ज- मीन कायमचे दरठरोती प्रमाणे दिली असल्यामुळे इतर प्रांतांत शेतकी संबंधानें बरोबर माहिती मिळते तशी या प्रांतावद्दल मिळत नाही. बंगालचे पर्वेकडील भागांत, बिहारपैकी उत्तरेकडील एका जिल्ह्यांत व समुद्राचे कांठचे भांगांत लागवडीलायक कांही जमीन अजून शिलक आहे. या प्रांतांतील कांहीं भागांत नद्यांचे ओघ फिरल्याने व कालवे झाल्याने जमिनीत पाणी फार सांचून हवा वाईट झाली आहे, व त्या कारणाने दोन जिल्ह्यांत लोकवस्तीही कमी झाली आहे. जमीन धारण करण्याच्या पद्धति व सारा-या प्रांतांत जमिनीवर सरकार देणे फारच हलके आहे. तें दर माणशी रु० ९-८ व दर एकरास रु. ८-८