पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/४०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३८८ ) लोक बाजाराचे ठिकाणों धान्य स्वतःच नेऊन विकतात. एकंदरीत शेतक-यांची प्राप्ती दीडपट वाढली आहे. सारा व कुळ-सायाचे ठरावांत अलीकडे फेरफार झाल्यामुळे साची वाढ सुमारे ८६ टक्के झाली आहे. शिक्षण, रस्ते, सफाई, गांवकामगारांचा पगार यावद्दलचे स्थानिक कर आहेत तेही वाढले आहेत. त्यांचा आकार साऱ्याचे रकमेचे संबंधाने सुमारे ११ टक्क्यांपर्यंत आहे. जमिनीपैकी ५४ टक्के जमिनीची लागण मालकाकडूनच होते, व बाकी ४६ टक्के जमीन कुळांकडे आहे. कुळांची स्थिति १८८७ चे कायद्याने सुधारली आहे. कुळे व मालक यांचे दरम्यान चांगला सलोखा आहे. कर्जबाजारीपणा-शेतकरी वर्गाची कर्जासंबंधाने स्थिति चांगली नाही. त्यांस कर्ज काढण्याची हौस फार असते. जमिनी विकत देण्याचा अधिकार असल्यामुळे सावकार जमिनी आपल्या ताब्यात घेण्याकडे जास्त लक्ष ठेवतात, यासाठी जमिनी सावकाराकडे जाण्याचे कसें बंद करता येईल यावद्दल स्थानिक सरकार विचार करति आहे. चिनाब पाटाचे संबंधाच्या जमिनी सरकारांनी देतांना त्या गहाण किंवा फरोक्त देण्याचा अधिकार ठेवला नाही व त्याचा परिणाम कसा होतो हे अजून पाहण्याचे आहे. दक्षिणेत शेतकऱ्यांसाठी जसा कायदा करण्यांत आला आहे तसा कायदा करावा अशीही सूचना झाली आहे. सुमारे ६ पासून ८ टक्के जमीन मालकांकडून, जमिनीची लागण करणारे लोकां- कडे गेली आहे, ही स्थिति चांगली नाही. धान्याच्या किमती-अलीकडे दहावारा सालांत धान्याची किंमत सुमारे तीस टक्के वाढली आहे, यामुळे पगारावर किंवा नियमित नेमणुकीवर उदरनिर्वाह करणारे लोकांस अडचण पडते.. मजुरदार व धंदेवाले लोक-शेतकाचे मजुरदार व गांवगन्नाचे शिल्पकार लोक यांस मजुरीबद्दल धान्यच मिळत. कोष्टयांचा धंदा बसत चालला आहे असें ह्मणतात, तरी ते लोक गिरण्यांतील सूत घेऊन विणतात, व त्या कप- ड्यांचा खपही पुष्कळ होतो. लोकरीचे कपडे पूर्वीपेक्षां आतां जास्त चांगले तयार होतात व त्यांचा खपही वरचे दाचे लोकांत चांगला होतो. सुतार व लोहार यांचा धंदा चांगला चालत आहे. महार व चांभार लोक परदेशांस पाठ- विण्यासाठी कातडी तयार करतात व त्यांपासून त्यांस चांगला फायदा मिळतो. एकंदरीत खाण्यापिण्याचे संबंधाने सुधारणा करण्याकडे जास्त पैसे खर्च कर- ण्यापेक्षां भांडी कुंडी खरेदी करणे, बायकांस दागिने करणे व लग्नकार्यात उध- ळेपणानें खर्च करणे यांतच लोक जास्त पैसा घालतात.