पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/४०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३८७ ) घेऊन पुष्कळ माल तयार करतात व लोकांत त्या कपड्यांचा खप व आवड आहे. सध्यांचा काळ त्यांस आणीबाणीचा आहे. इतर धंदेवाले लोकांत व्यापारी व सावकार यांचे खालोखाल प्राप्तीचा धंदा ह्मणजे वकीलीच आहे. विद्याव्यासंगी वर्गास विद्याविषयक धंद्याशिवाय इतर धंदे करावेसे वाटत नाहीत ; यामुळे वकीलीत व नौकरीत. लोकांची गर्दी झालेली आहे. वरिष्ठ वर्गांचे लोक आधुनिक वैद्यकांत थोडे कमी पडतात. डाक्तर लोकांचा धंदा शहरांतून चांगला चालतो व त्यांची उपयुक्तता लोकांस जास्त समजू लागली आहे. ऐजिनियरी ज्ञानाचे लोकांचा गुजारा आगगाड्या, कारखाने व सरकारी पब्लिक वर्क्सची कामें यांचे वरच चालतो. याशिवाय विनपगारी धंदेवाले लोक ह्मणजे भिक्षुक वर्ग, यांचे स्थितीत महागाईमुळे, यजमान वर्गाची दातृत्वबुद्धि जशी कमी झाली असेल त्या मानाने, कांही कमीपणा आला असावा. पगारदार व नियमित प्राप्तीचे लोकांविषयी पाहिले तर नेटिव लोकांचे महागाई- मुळे व युरोपियन लोकांचे रुप्याचा भाव उतरल्यामुळे नुकसान झाले आहे. नौकरीसाठी तयार असणारे लोकांची संख्या फार वाढली आहे. लोकस्थितांचे संबंधाने सामान्य सर्वसाधारण मुद्यांचे हे अल्प विवरण झाले; आतां प्रांतवार वर्णन करावयाचें तेंही अधिक सक्षिप्त रीतीने करण्यांत येईल. पंजाब प्रांत -पंजाब प्रांतांत हवेमध्ये वेगळाल्या ऋतूंत फार फरक पडतो, यामुळे लोकांस खाण्यापिण्यास अन्नपाणी, राहण्यास घरें, व वापरण्यास वस्त्रे प्रावणे चांगली असावी लागतात. या प्रांतांत पांचसहा मोठी शहरे आहेत व त्यांत एकंदर वस्तीपैकी शेकडा साडेअकरा लोक राहतात. शहराचे बाहेर राहणारे लोक बहुतेक शेतकीवर निर्वाह करणारे आहेत. सन १८९१.९२चे पूर्वीचे दहा वर्षांत २२ लक्ष एकर जमीन नवीन लागवडीस आली. पाटबंधाऱ्याची कीमें झाल्याने बागाईत वाढले आहे. पाटबंधान्याची सोय वाढत जाईल तशी पड असलेली जमीन लागवडीस येईल. दोन पिके घेण्याची वहिवाटही वाढली आहे. बागाइताने पीक जास्त मिळतें इतकेच नाही, तर चांगली मौल्यवान पिकेंही करता येतात. या प्रांतांत मोठे महत्वाचे पीक हाणजे गव्हाचे आहे. पुष्कळ गहूं परदेशास रवाना होतो, तरी वाईट पिकाची साले शिवाय करून इतर साली पुरेसा धान्य संग्रह या प्रांतांत राहतो. सुमारे ई जमिनींत बागाईत असल्याने पीक अगदी नाही असे होत नाही. अलीकडे १०।१२ सालांत आग- गाडीचा रस्ता दुप्पट झाला आहे, व दुसरे गाडीरस्तेही पुष्कळ वाढले आहेत; यामुळे शेतकीचा माल खपण्यास चांगली सोय झाली आहे. आता शेतकरी