पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/४०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३८६) इष्टटाचे संरक्षणासाठी मुद्दाम कायदे करावे लागले. झांशी प्रांतांत व महा- राष्ट्रांत जामनीचे मालकांची वाईट स्थिति होण्यास काही विशेष कारणेही झाली होती. साधारणतः ज्या ठिकाणी परदेशांस जाणारे पीक विशेष होतें असे ठिकाणी जमिनीची किंमत वाढली आहे व जमिनीचे मालकीत फेरफार होत आहे. ह प्रकार इतर प्रांतांत सर्वसाधारण असा नाही. जमीन धारण करणारे सावकारांची संख्या संस्थानांपेक्षां इंग्रजी मुलखांत जास्त वाढली असे गेले मनुष्यगणतीत दिसून आले आहे. शेतकरी लोकांची स्थिति सुधारण्यासाठी विशेष कायदे-शेत- करी वर्गाची स्थिति सुधारण्यासाठी कायदे झाले आहेत; त्यांत दक्षिणेतील शेतकन्यांची स्थिति सुधारण्याचा कायदा हा विशेष महत्वाचा आहे. ह्या सर्व कायद्यांपासून शेतकऱ्यांची कर्जापासून पूर्ण मुक्तता झाली नाही तरी त्यांचा पुष्कळ फायदा झाला आहे. हा कायदा पंजाब व मध्य प्रांतांत लागू करावा असें कांही लोकांचे ह्मणणे आहे. कुळांस जमिनी गहाण किंवा फरोक्त कर- ण्यास परवानगी आहे ती काढून घ्यावी अशीही काही लोकांची सूचना आहे. कुर्ग व वायव्य प्रातांत ह्याप्रमाणे थोडीशी वहिवाट चालू झाली आहे व तिचा कसा काय परिणाम होतो तें सरकार पहात आहेत. मजूरदार--येथपर्यंत शेतकरी वर्गाचे स्थितीसंबंधाने मुख्यत्वे करून विचार झाला. आतां मंज़रदार वर्गाचे संबंधाने पहातां त्यांची स्थिति पुष्कळ सुधारली आहे असे दिसते. "धान्यांचे दरांत वाढ झाल्याने त्यांचे नुकसान झाले नाही, कारण शेतकीकडे जे मजुरी करतात यांस मजुरीबद्दल धान्यच मिळतें. रांचे जवळ मात्र मजुरीबद्दल पैसा देतात व तेथे मजुरीचे दरांत वाढ झाली आहे. आगगाड्या, कारखाने, पब्लिक वर्क्सची कामें वगैरे वाढली आहेत. व त्यांगनून मजुरीवर निर्वाह करणारे लोकांस चांगली मदत होते. करागोर व धंदेवाल लोक-आतां इतर कारागीर लोकांचे संबंधाने विचार करावयाचा आहे. सुतार व लोहार यांचे स्थितीत विशेषसा फरक झाला नाही. धातूची भांडी जास्त झाल्याने कुंभाराचे धंद्यास कांहीं हिसका वसला असावा, तरी घरांसाठी पूर्वीपेक्षा जास्त विटा कोले लागू लागल्याने त्यांनाही कांहों मोबदला मिळाला आहे. तेल्याचे धंद्यास परकीय केरोसीन तेलाने फारच पडती कळा आली आहे; या लोकांची शेतें असतात व ती ते करतात किंवा परदेशी पाठविण्यासाठी गळिताची धान्ये गोळा करून देतात. कोष्टयांची स्थिति वाईट झाली आहे. त्यांचा धंदा परकीय कापडाचा प्रसार झाल्याने खालावला आहे. ही स्थिति आजचीच नाही. हल्ली हे लोक परकी सूत शह-